इंग्लंडचा धडाकेबाज खेळाडू एन्ड्रयू फ्लिंटॉपला एन्ड्रयू फ्लिंटॉपला चेन्नई सुपर किंग्स संघाने ७ कोटी ५५ लाख रुपयांना विकत घेतले. तर केविन पिटरसनला ७ कोटी ५५ लाख रुपयांना रॉयल चॅलेंजर बंगळुरु संघानं खरेदी केले.
न्यूझीलंडचा धडाकेबाज गोलंदाज शेन बॉन्डला कोलकाता नाईट रायडर्स संघाने तर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किएरॉन पोलार्डला मुंबई इंडियन्सने प्रत्येकी ३ कोटी ४२ लाख रुपयांना खरेदी केले.
गौतम गंभीरला कोलकाता नाईट रायडर्सने ११ कोटी ४ लाख तर युसूफ पठाणला ९ कोटी ७० लाख रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला ९ कोटी २० लाख रुपयांना खरेदी केले.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरु झालेल्या लिलावात भारताचा क्रिकेट कर्णधार महेंद्र सिंग धोनीसाठी प्रथमच कोटींची बोली लागली. चेन्नई सुपर किंग्सने धोनीला तब्बल ६ कोटी रुपयाला खरेदी केले. तर ऑस्ट्रेलियाच्या एन्ड्य्रू सायमंड्सला हैदराबाद संघाने ५ कोटी ३० लाख रुपयात खरेदी केले.
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला २०१२ साली आयपीएल लिलावामध्ये लॉटरी लागली. चेन्नई सुपर किंग्सने त्याला तब्बल ९ कोटी ७२ लाख रुपयांना खरेदी केले. याच लिलावात श्रीलंकेचा खेळाडू महेला जयवर्धनेला दिल्ली डेअरडेव्हिल्सने ६ कोटी ०८ लाख रुपयांना खरेदी केले. तर व्हीव्हीएस लक्ष्मणला कोणीही खरेदी केले नाही.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला मुंबई इंडियन्सने सर्वाधिक बोली लावून ५ कोटी ३० लाख रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगला सुध्दा मुंबई इंडियन्सनेच २ कोटी १० लाख रुपयांना खरेदी केले होते. तर मुंबईकर अभिषेक नायरला पुणे वॉरियर्सने ३.५ कोटींना विकत घेतले होते.
डावखुरा फलंदाज युवराज सिंगला १४ कोटी रूपयांची सर्वाधिक बोली लावून बंगलोरच्या रॉयल चॅलेंजर्सनी खरेदी केले. त्याच्यानंतर सर्वाधिक बोली लागली ती यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी. दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला १२ कोटी ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले.
वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघात स्थान न मिळणा-या युवराजने आयपीएलमध्ये आपणच युवराज असल्याचे दाखवून दिले. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आत्तापर्यंतची सर्वाधिक बोली लावून युवराज सिंगला तब्बल १६ कोटी रुपयाला विकत घेतले. रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघानं दिनेश कार्तिकसाठी १० कोटी ५० लाख रुपये मोजले.