IPL : पंजाब किंग्सची मोठी अ‍ॅक्शन, अनिल कुंबळेला हेड कोच पदावरून हटवलं

कुंबळे यांच्या काळात पंजाब किंग्स 2020 आणि 2021 दोन्ही वेळा पाचव्या स्थानावर राहिली. लीगमध्ये एकूण आठ संघांचा समावेश होता. तसेच 2022 मध्ये एकूण दहा संघ मैदानात उतरले होते. तेव्हा पंजाब किंग्स संघ सहाव्या स्थानावर होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 10:23 PM2022-08-25T22:23:39+5:302022-08-25T22:25:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL Big action of Punjab Kings, Anil Kumble removed from the post of head coach | IPL : पंजाब किंग्सची मोठी अ‍ॅक्शन, अनिल कुंबळेला हेड कोच पदावरून हटवलं

IPL : पंजाब किंग्सची मोठी अ‍ॅक्शन, अनिल कुंबळेला हेड कोच पदावरून हटवलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील पंजाब किंग्सनेअनिल कुंबळेला तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर मुख्य प्रशिक्षकपदावरून हटविले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, इयॉन मॉर्गन, ट्रेव्हर बेलिस आणि भारताचे एक माजी प्रशिक्षक यांच्यासोबत ही जबाबदारी स्वीकारण्यासंदर्भात संपर्क साधला  जात आहे.

पंजाब किंग्सची मोठी अ‍ॅक्शन -
ईएसपीएन क्रिकइंफोने एक वृत्तात म्हटल्यानुसार, 'कुंबळेला 2020 सीझनपूर्वी पंजाब किंग्सचे मुख्य कोच आमि पुढील तीन हंगामांसाठी संघाचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, प्रीति झिंटा, उद्योगपती मोहित बर्मन, नेस वाडिया, करण पॉल आणि पंजाब किंग्सचे CEO सतीश मेनन यांच्यासह मालक मंडळींच्या एका निर्णयानंतर, त्याला फ्रेंचायजीपासून दूर करण्यात आले आहे.'

कोच म्हणून कुंबळेची कामगिरी - 
कुंबळे यांच्या काळात पंजाब किंग्स 2020 आणि 2021 दोन्ही वेळा पाचव्या स्थानावर राहिली. लीगमध्ये एकूण आठ संघांचा समावेश होता. तसेच 2022 मध्ये एकूण दहा संघ मैदानात उतरले होते. तेव्हा पंजाब किंग्स संघ सहाव्या स्थानावर होता. 

नव्या कोचच्या शोधात पंजाब किंग्स -
संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे, की फ्रेंचायझी कुंबळे यांच्या जागी एका दुसऱ्या कोचच्या शोधात आहे आणि लवकरच एका नावाची घोषणा होईल. सोशल मिडियावरील काही रिपोर्ट्समध्ये, पंजाब किंग्सने इंग्लंडचा माजी कर्णधार इयोन मोर्गन आणि श्रीलंका आणि इंग्लैंडचे माजी मुख्य कोच ट्रेव्हर बेलिस यांच्याशिवाय भारताचे एक माजी कोच यांच्याशी संपर्क केला आहे, असा दावा करण्यात आला आहे.
 

Web Title: IPL Big action of Punjab Kings, Anil Kumble removed from the post of head coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.