Indian Premier League ( IPL ) 2008च्या मोसमात शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर, मिसबाह-उल-हक, युनिस खान, कामरान अकमल, आदी पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. पण, 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्व क्रिकेट संबंध तोडले. त्यानंतर IPLमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास बंदी घालण्यात आली. आता UAEत IPL चा 13वा पर्व खेळवण्यात येत आहे आणि IPLमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्याची संधी न मिळणे हे त्यांचे दुर्भाग्य असल्याचे मत पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं व्यक्त केलं.
Arab News शी बोलताना आफ्रिदी म्हणाला,''IPL हा मोठा ब्रँड आहे आणि बाबर आझम किंवा अन्य पाकिस्तानी खेळाडूंसाठी ही उत्कृष्ट संधी असती. तणावाखाली खेळणं आणि दिग्गज खेळाडूंसह ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी त्यांना मिळाली असती. माझ्या मते IPLमध्ये खेळायला न मिळाल्यानं पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या संधीला मुकावे लागत आहे.''
भारतातील त्याच्या चाहत्यांबद्दलही आफ्रिदीने मत व्यक्त केले. ''प्रेम हे प्रेम असतं... भारतात मी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.. भारतीयांकडून मिळालेल्या प्रेमाचे मी नेहमीच आदर केला. आता मी सोशल मीडियावरही जेव्हा बोलतो, तेव्हा भारतातून अनेक मॅसेज येतात आणि मी त्याना रिल्पायही देतो. भारतातील माझा अनुभव हा उत्कृष्ट होता,''असे आफ्रिदी म्हणाला.
नरेंद्र मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाक क्रिकेट होणे शक्य नाही, या वाक्याचा त्यानं पुनर्उच्चार केला. तो म्हणाला,''भारताविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानी सरकार नेहमी तयार आहेत, परंतु सध्या भारतातील सत्ताधारी सरकार असल्यानं ते शक्य नाही. मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका होईल, याची शक्यता नाहीच.''
Web Title: IPL is a big brand, Babar Azam and many other Pakistani players missing big opportunity: Shahid Afridi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.