Join us  

बालपणीची क्रश ते धर्मपत्नी! धोनीच्या CSKचा शिलेदार मराठमोळा खेळाडू अडकला विवाहबंधनात 

आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू तुषार देशपांडे विवाहबंधनात अडकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 2:36 PM

Open in App

कल्याण : आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू तुषार देशपांडे विवाहबंधनात अडकला आहे. आयपीएल २०२३ मध्ये चमकदार कामगिरी करून तुषारने प्रसिद्धी मिळवली. त्याने आज त्याची प्रेयसी नभा गड्डमवारसोबत सातफेरे घेतले. नभा ही तुषारची शाळेतील मैत्रीण आहे. आयपीएलच्या मागील हंगामानंतर तुषार आणि नभा यांचा साखरपुडा झाला होता. 

तुषारची पत्नी नभा गड्डमवार कोण, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर ती एक आर्टिस्ट असल्याचे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून समजले. खरं तर नभाबद्दल आणखी माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, तुषार देशपांडेने आयपीएल २०२३ मध्ये CSKसाठी सर्वाधिक बळी घेतले होते. MS Dhoni च्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाचवे आयपीएल जेतेपद जिंकले.

तुषार देशपांडेने २०२० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलचा मागील हंगाम तुषारसाठी खास राहिला. त्याने आयपीएल २०२३ मध्ये १६ सामन्यांत २१ बळी घेतले. तर आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने एकूण २३ सामने खेळले असून २५ बळी घेण्यात मराठमोळ्या खेळाडूला यश आले आहे. २०२० च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेला तुषार मागील तीन हंगामातून चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत दिसत आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३कल्याणलग्नचेन्नई सुपर किंग्स