IPL 2022: 'तो' परत येणार, लिलावात टीम प्रचंड पैसा ओतणार; CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

IPL 2022: सीएसके लिलावासाठी सज्ज; रणनीती तयार; मॅच विनरसाठी ताकद पणाला लावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 02:03 PM2021-12-07T14:03:19+5:302021-12-07T14:05:25+5:30

whatsapp join usJoin us
ipl csk will try to buy faf du plessis at any cost revealed csk ceo kashi vishwanath | IPL 2022: 'तो' परत येणार, लिलावात टीम प्रचंड पैसा ओतणार; CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

IPL 2022: 'तो' परत येणार, लिलावात टीम प्रचंड पैसा ओतणार; CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनसाठी सगळे संघ सज्ज झाले आहेत. चारवेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जनं कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईल अलीला रिटेन केलं आहे. सीएसकेमध्ये एकापेक्षा एक खेळाडू आहेत. मात्र रिटेन पॉलिसीनुसार कमाल चार खेळाडूंनाच संघात कायम ठेवता येतं. त्यामुळे सीएसकेला काही बड्या खेळाडूंना रिटेन करता आलेलं नाही.

पुढील आयपीएलसाठी होणाऱ्या लिलावात कोणत्या खेळाडूला सर्वप्रथम ताफ्यात घेतलं जाईल याची माहिती सीएसकेकडून देण्यात आली आहे. मॅच विनर फाफ ड्यूप्लेसिसला संघात घेण्यासाठी सीएसके प्रयत्न करणार आहे. चार खेळाडूंनाच रिटेन करण्याचा नियम असल्यानं सीएसकेनं ड्यूप्लेसिसला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेनं आतापर्यंत मिळवलेल्या यशात ड्यूप्लेसिसचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सीएसकेला पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी सीएसके जोर लावणार आहे.

सीएसकेनं नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये सीईओ काशी विश्वनाथ यांनी लिलावात संघाची काय रणनीती असेल त्यावर सूचक भाष्य केलं. 'ड्यूप्लेसिसनं संघात परतावं असं आम्हाला वाटतं. त्यानं आमच्यासाठी नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. दोन हंगामात त्याच्या कामगिरीमुळे आम्ही अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. त्यामुळे त्याला संघात पुन्हा आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू,' असं विश्वनाथ यांनी सांगितलं.

फॅफची शानदार कामगिरी
फॅफ ड्यूप्लेसिसनं सीएसकेला २०२१ च्या फायनलमध्ये एकहाती विजय मिळवून दिला. त्यानं अंतिम सामन्यात ८६ धावांची खेळी केली होती. आतापर्यंत आयपीएलमध्ये १०० सामन्यांत त्यानं २ हजार ९३५ धावा केल्या आहेत. मात्र सीएसकेनं त्याला रिटेन केलं नाही. सीएसकेनं ४ वेळा आयपीएलचं जेतेपट पटकावलं आहे. तर ९ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. सीएसकेच्या या सातत्यपूर्ण कामगिरीत ड्यूप्लेसिसचा महत्त्वाचा वाटा आहे.
 

Web Title: ipl csk will try to buy faf du plessis at any cost revealed csk ceo kashi vishwanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.