Join us  

एका वर्षाच्या बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरला मिळाले कर्णधारपदाचे गिफ्ट

या बंदीचे विपरीत परीणाम वॉर्नर आणि स्मिथ यांच्या कुटुंबियांवरही झाले. हा वर्षभराचा काळ दोन्ही खेळाडूंसाठी वाईट गेला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 4:28 PM

Open in App
ठळक मुद्देगेल्या वर्षी वॉर्नर आणि स्मिथ दोघेही आयपीएलमध्ये खेळले होते.

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामावीर डेव्हिड वॉर्नर आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यापूर्वी वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय आला होता. पण त्याच वॉर्नरला आता संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेत एक कसोटी सामना खेळताना वॉर्नर आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांना चेंडूशी छेडछाड करताना पकडले होते. त्यानंतर आयसीसी आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळांनी त्यांच्यावर कडक शिक्षा केली होती. त्यानंतर या दोघांवर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Image result for david warner

या बंदीचे विपरीत परीणाम वॉर्नर आणि स्मिथ यांच्या कुटुंबियांवरही झाले. हा वर्षभराचा काळ दोन्ही खेळाडूंसाठी वाईट गेला होता. या वर्षभरात ऑस्ट्रेलियाबरोबरच आयपीएलमध्येही या दोघांना खेळता आले नव्हते. त्यामुळे या गोष्टीचा फटका दोघांच्याही कारकिर्दीला बसला होता.

गेल्या वर्षी वॉर्नर आणि स्मिथ दोघेही आयपीएलमध्ये खेळले होते. या वर्षीही हे दोघे आयपीएलमध्ये दिसणार आहेत. पण या वर्षी वॉर्नरच्या आयुष्यात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. कारण आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद या संघाने वॉर्नरला कर्णधारपद बहाल केले आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद भूषवताना पाहायला मिळेल.

वॉर्नरने यापूर्वीही हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने आयपीएलचे जेतेपदही पटकावले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वॉर्नरला हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद दिल्यामुळे ते पुन्हा एकदा जेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआयपीएलसनरायझर्स हैदराबाद