Mitchell Starc takes His First T20 Fifer : मिचेल स्टार्कनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करताना यंदाच्या हंगामात पहिला पंजा मारला आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याने सनरायझर्स हैदराबादचा अर्धा संघ तंबूत धाडला. आयपीएलमध्येच नव्हे तर टी-२० कारकिर्दीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पहिल्यांदाच पाच विकेट्स घेतल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दुसऱ्याच षटकात दोन विके्टस घेत SRH ला दिले धक्क्यावर धक्के
स्टार्कने आपल्या वैयक्तिक दुसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबादच्या डावातील तिसऱ्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. आधी त्याने इशान किशनला माघारी धाडले. त्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या नितीश कुमार रेड्डीलाही त्याने शून्यावर माघारी धाडले. गती आणि स्विंगनं त्याने हैदराबादच्या स्फोटक फलंदाजीला सुरुंग लावला.
IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा!
ट्रॅविस हेडसाठी तो पुन्हा ठरला डोकेदुखी
आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ट्रॅविस हेडला तर सातत्याने मामू बनवल्याचे पाहायला मिळाले आहे. पुन्हा एकदा स्टार्क हेडसाठी डोकेदुखी ठरला ८ व्या डावात सहाव्यांदा त्याने ट्रॅविस हेडला तंबूचा रस्ता दाखवला. आघाडीच्या फलंदाजीतील तीन तगड्या फलंदाजांना स्वस्ता माघारी धाडणाऱ्या स्टार्कनं तळाच्या फलंदाजीतील मुल्डर आणि हर्षल पटेल यांची विकेट घेत टी-२० कारकिर्दीत पहिल्यांदा पाच विकेट्सचा डाव साधला
सनरायझर्स हैदहादाचा डाव १६३ धावांत आटोपला.
मिचेल स्टार्कनं सुरुवातीला दिलेल्या धक्क्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ अडचणीत सापडला होता. यंदाच्या हंगामातून पदार्पण करणाऱ्या अनिकेत वर्मा हैदराबाद संघाच्या मदतीला धावला. त्याने ४१ चेंडूत ७४ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर हैदराबादच्या संघानं १८.४ षटकात सर्वबाद १६३ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून स्टार्कशिवाय कुलदीप यादवनं २२ धावा खर्च करून ३ विकेट्स तर मोहित शर्माच्या खात्यात एक विकेट जमा झाली. हैदराबादच्या संघानं अभिषेकच्या रुपात एक रन आउटच्या रुपात विकेट गमावल्याचे पाहायला मिळाले.