Join us  

... म्हणून ऑसी खेळाडू विराटशी पंगा घ्यायला घाबरतात, मायकेल क्लार्कचा गंभीर आरोप

माजी कर्णधाराच्या या आरोपात तथ्य आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 2:31 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. इंडियन प्रीमिअर लीगमुळे जगभरातील अनेक खेळाडूंना अमाप पैसा मिळतो. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू टीम इंडियाविरुद्ध खेळताना वाद टाळतात, जेणेकरून त्यांना आयपीएलमध्ये चांगली किंमत मिळेल. मैदानावर ऑसी खेळाडू सर्वाधिक आक्रमक मानले जातात, परंतु ऑसी खेळाडू विराट कोहली आणि टीमशी स्लेजिंग करण्यास कचरतात. त्याला कारण आहे आयपीएल करार, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मिचेल क्लार्कने व्यक्त केले.

तो म्हणाला,''आयपीएलमुळे भारतातील क्रिकेट मंडळ हे आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन आणि अन्य देशांतील खेळाडू विराट कोहलीशी किंवा कोणत्याही भारतीय खेळाडूशी स्लेजिंग करताना घाबरतात. कारण, एप्रिल महिन्यात त्यांना विराट आणि टीमसोबत खेळायचे असते,'' असे क्लार्कनं Cricbuzz या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

आयपीएल 2020च्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सर्व फ्रँचायझींमध्ये चुरस पाहायला मिळाली. पॅट कमिन्सनं सर्वाधिक 15.5 कोटींची कमाई केली, तर ग्लेन मॅक्सवेल ( 10.75 कोटी), नॅथन कोल्टर नील ( 8 कोटी) यांनी सर्वाधिक भाव खाल्ला. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांनी मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात कायम ठेवले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेबद्दल क्लार्क म्हणाला,''आयपीएलमध्ये कोट्यवधींचा करार मिळेल, हे स्वप्न पाहताना ऑसी खेळाडू टीम इंडियाच्या खेळाडूंशी स्लेजिंग करत नव्हते. मी कोहलीची स्लेजिंग करणार नाही, त्याच्या संघाकडून मला खेळायचे आहे, मला 1 मिलियन डॉलर नक्की मिळतील, हे सर्व खेळाडूंच्या डोक्यात सुरू असतात.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनमध्ये दिग्गज खेळाडूची 'Sex Party'; कॉलगर्ल्सना बोलावलं घरी!

Sad : दिग्गज फुटबॉल प्रशिक्षकाच्या आईचे Corona मुळे निधन

हिंदू खेळाडूच्या विनंतीचा राखला मान.... शाहिद आफ्रिदीकडून पाकमधील हिंदूंना मदत

उपाशी पोटी झोपी नका, मला मेसेज करा; बेशिस्त अन् बेलगाम म्हणून कुप्रसिद्ध खेळाडूची दिलदारी

टॅग्स :आयपीएल 2020मायकेल क्लार्कविराट कोहली