Join us  

Big Breaking : IPL 2022 Final ची तारीख अन् ठिकाण ठरले, BCCIने Play Off चे वेळापत्रक जाहीर केले

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या फायनलची तारीख अन् ठिकाण अखेर ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 8:59 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या फायनलची तारीख अन् ठिकाण अखेर ठरले. IPL 2022च्या साखळी फेरीचे सामने मुंबई, पुण्यात खेळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्ले ऑफच्या लढती बाहेर होतील हे आधीच निश्चित होते. पण, त्या लढती कोणत्या शहरात होतील हे निश्चित होत नव्हते. पण, अखेर शनिवारी त्याची घोषणा केली गेली. आयपीएल २०२२ची फायनल अहमदाबाद येथे २९ मे ला खेळवण्यात येईल, तर प्ले ऑफ व एलिमिनेटर २४ व २६ मे ला कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे. दुसरी प्ले ऑफ २७ मे ला अहमदाबाद येथे होईल. विशेष म्हणजे या सर्व सामन्यांना संपूर्ण प्रेक्षकक्षमतेची परवानगी दिली गेली आहे. IPL 2022 Final to be Held in Ahmedabad With Full Crowd Capacity; Lucknow to Host Women's Challengers 

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शनिवारी हे वृत्त सांगितले. याशिवाय २४ ते २८ मे या कालावधीत महिला चॅलेंजर्स स्पर्धा लखनौ येथे खेळवण्यात येणार असल्याचाही निर्णय झाला. ''महिला चॅलेंजर्स सीरिद २४ ते २८ मे या कालावधीत लखनौ येथे खळवण्यात येईल. आयपीएल प्ले ऑफच्या लढती कोलकाता व अहमदाबाद येथे खेळवण्यात येतील  आणि स्टेडियमवर पूर्ण प्रेक्षकक्षमतेला परवानगी दिली गेली आहे,''असे गांगुलीने सांगितले.   

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआय
Open in App