इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin ) याला आईच्या आजारपणामुळे अचानक चालू सामना सोडून चेन्नईला परतावे लागले होते. २४ तासानंतर तो पुन्हा कसोटी खेळायला आला आणि त्याच्या या कठीण काळात कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला साथ दिली. काल आर अश्विनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याने आईच्या आजारपणाची बातमी कळताच नेमकं काय घडलं हे सांगितलं... आज आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने तोच व्हिडीओ पोस्ट करून कर्णधार रोहित शर्मासाठी लिहिलेल्या वाक्याची चर्चा रंगली आहे.
अश्विनने कर्णधार रोहितने कठीण काळात कशी मदत केली हे सांगितले. रोहितने सर्व आवश्यक व्यवस्था केली आणि फिजिओ कमलेशला अश्विनसोबत पाठवले. रोहितच्या या अविश्वसनीय कृतीसाठी अनेकांनी कौतुक केले. राजस्थान रॉयल्सनेही कौतुक केले. "प्रिय रोहित शर्मा, भारतीय संघाला तुझ्यासारखा कर्णधार मिळाला याचा अभिमान आहे," असे ट्विट राजस्थान रॉयल्सने केले.
अश्विनने तिसऱ्या कसोटी सामन्यातून कारकिर्दीतील ५०० कसोटी बळी पूर्ण केले. यानंतर आईची तब्येत ठीक नसल्याचे त्याला समजले अन् घरी परतावे लागले. अश्विनने सांगितले की, राजकोट ते चेन्नईची फ्लाइट शोधायला मी सुरुवात केली, पण कोणतीही फ्लाइट सापडली नाही. राजकोट विमानतळ संध्याकाळी ६ वाजता बंद होते. मी तणावात असताना रोहित आणि द्रविड यांनी त्याला रूममध्ये जाण्याचा सल्ला दिला अन् भारतीय कर्णधाराने पुढील नियोजन केले. रोहितने चार्टर्ड प्लेनची व्यवस्था करून दिली.
Web Title: IPL franchise Rajasthan Royals puts out heartwarming message for India captain for his gesture towards Ashwin
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.