सध्या फ्रँचायझी ट्वेंटी-२० लीगची क्रेझ आहे... इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी अन् यशस्वी फ्रँचायझी लीग आहे.. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील स्टार खेळाडू उत्सुक असतात.. आयपीएल २०२३ ही जोरात सुरू आहे. भारतासह जगभरातील अनेक मोठे क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आयपीएलसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) खास अडीच महिन्यांची विंडो ठेवली आहे आणि त्यामुळे आयपीएलच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खूप कमी आहे. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही आयपीएल फ्रँचायझींनी संघांसाठी खेळण्यासाठी अनेक खेळाडूंना आपल्या देशासाठी खेळणे सोडा असा सल्ला दिल्याचे, वृत्त समोर येत आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूने पार्टीत महिलेला छेडलं अन् पुढे जे घडलं ते सर्वांना महागात पडलं!
ब्रिटिश वृत्तपत्र द टाइम्सने एका वृत्तात दावा केला आहे की, काही आयपीएल फ्रँचायझींनी इंग्लंडसह इतर अनेक देशांतील क्रिकेटपटूंशी संपर्क साधला आहे. संघ आणि खेळाडूंमध्ये करारावर चर्चा केली जात आहे, ज्या अंतर्गत ते वर्षभर वेगवेगळ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळताना दिसतील. यासाठी त्यांना त्यांच्या देशाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाशी पूर्णपणे संबंध तोडावे लागतील. अहवालानुसार, किमान आयपीएल फ्रँचायझींनी या मुद्द्यावर इंग्लंडच्या खेळाडूंशी अनौपचारिक चर्चा सुरू केली आहे. यापैकी काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देखील आहेत. वार्षिक करारांतर्गत इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी संबंधित आहेत. त्यांच्याशिवाय न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांशी संबंधित खेळाडूही आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"