Join us  

IPL मुळे पाकिस्तान दौऱ्यातून न्यूझीलंडच्या दिग्गजांचा काढता पाय; युवा खेळाडूंना संधी 

Pak vs NZ : पाकिस्तानविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 3:53 PM

Open in App

pak vs nz odi । नवी दिल्ली : पाकिस्तानविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा झाली आहे. यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथमच्या नेतृत्वात किवी संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. खरं तर न्यूझीलंडने पाकिस्तानी संघाचे माजी दिग्गज सकलेन मुश्ताक यांना आपल्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक केले आहे. मुश्ताक हे आतापर्यंत पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक होते आणि आता ते आपल्याच देशाच्या संघाविरूद्ध रणनिती आखताना दिसणार आहेत.

दरम्यान, न्यूझीलंडचा संघ ९ एप्रिलला पाकिस्तान दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. किवी संघ पाकिस्तानच्या धरतीवर सर्वप्रथम ५ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळेल आणि त्यानंतर वन डे मालिका खेळवली जाईल. आगामी दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. कारण किवी संघाचे बऱ्यापैकी खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत. त्यामुळेच पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या किवी संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. टॉम लॅथम ट्वेंटी-२० आणि वन डे दोन्ही मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. 

न्यूझीलंडच्या संघात युवा खेळाडूंना संधी न्यूझीलंडच्या संघात बेन लिस्टर आणि कोले मॅक्कान्शी यांना संधी मिळाली आहे, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतात. याशिवाय जिमी नीशम, डेरिल मिचेल, हेनरी निकोल्स, इश सोधी आणि मॅट हेनरी हे खेळाडू वन डे मालिकेत दिसतील. 

पाकिस्तानविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ - टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, चाड बोव्हेस, मॅट हेनरी, बेन लिस्टर, कोले मॅक्काशी, डम मिल्ने, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, हेनरी निकोल्स, रचिन रवींद्र, हेनरी शिप्ले, इश सोधी, ब्लेअर टिकनर आणि विल यंग. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :पाकिस्तानन्यूझीलंडआयपीएल २०२३आंतरराष्ट्रीय क्रिकेटटी-20 क्रिकेट
Open in App