दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहली हा आयपीएल रॉयल चॅलेंजर्सचे नेतृत्व करतो. फिटनेसप्रती नेहमी सक्रिय आणि सावध असलेला खेळाडू अशी त्याची ओळख. सध्या तो संघासोबत सहा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या १३ व्या सत्राआधी हॉटेलच्या खोलीतच कोहलीने वर्कआऊट सुरू केले. आज गुरुवारी त्याचा क्वारंटाईन कालावधी संपणार आहे. तिन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर तो मैदानावर प्रत्यक्ष सरावाला सुरुवात करेल. खोलीत वर्कआऊटचे फोटो विराटने शेअर केले. यात तो बाल्कनीत पुशअप्स करताना आणि सोबतच डंबेल्सच्या साहाय्याने वेट ट्रेनिंग करताना दिसत आहे.
आरसीबीचे आजपासून तीन आठवड्यांचे शिबिर सुरू होईल. ‘आमचा सहयोगी स्टाफ प्रत्येक खेळाडूला सर्वोत्कृष्ट खेळासाठी त्यांना सज्ज करेल,’ असा विश्वास संघाचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी व्यक्त केला. ‘कोरोना टाळण्यासाठी आमचा संघ आयसीसी अकादमीत चार खेळाडूंच्या गटात सराव करतील,’ अशी माहिती मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी दिली.
राजस्थान रॉयल्सचा व्हर्च्युअल कोचिंगवर भर
राजस्थान रॉयल्सने व्हर्च्युअल कोचिंगवर भर दिला आहे. त्यांनी डिजिटल अकादमी अॅपची निर्मिती केली असून ‘द पॅव्हेलियन व्हेअर प्लेअर मीट्स कोच’ असे नाव दिले. सर्व देशांमधील सर्व वयोगटांतील खेळाडूंचे क्रिकेट कौशल्य विकसित करणे हा या अॅपचा उद्देश आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबचे सर्व खेळाडू निगेटिव्ह
गेल्याच आठवड्यात यूएईमध्ये आगमन झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघाच्या खेळाडूंनी सहा दिवसाचा अनिवार्य क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्याचवेळी या दोन्ही संघांच्या खेळाडूंची यादरम्यान तीन वेळा कोरोना चाचणी झाली होती आणि या तिन्ही चाचणीमध्ये खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
खेळाडू कोरोनामुक्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता या दोन्ही संघाचे खेळाडू सराव सत्रासाठी सज्ज आहेत. दुबईमध्ये उष्ण वातावरण असल्याने उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी दोन्ही संघांनी संध्याकाळी सराव करण्याची योजना आखली आहे. यूएईमध्ये सर्वप्रथम पंजाब आणि राजस्थान संघांचे आगमन झाले होते. तसेच, मागच्याच गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघही यूएईमध्ये पोहचला होता. त्यांचा संघ अबूधाबी येथे थांबला आहे. खेळाडू कोरोनामुक्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता या दोन्ही संघाचे खेळाडू सराव सत्रासाठी सज्ज आहेत. दुबईमध्ये उष्ण वातावरण असल्याने उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी दोन्ही संघांनी संध्याकाळी सराव करण्याची योजना आखली आहे. यूएईमध्ये सर्वप्रथम पंजाब आणि राजस्थान संघांचे आगमन झाले होते.
Web Title: IPL: Kohli's room 'workout'; RCB's three-week camp from today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.