नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट जगतातून पुन्हा एकदा मोठ्या घोटाळ्याची बातमी समोर आली आहे. खेळाडूंना राज्य आणि आयपीएल संघांकडून खेळण्याची संधी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहे. या घोटाळ्या प्रकरणी प्रशिक्षक कुरबीर रावत यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी आठ ते नऊ खेळाडूंकडून पैसे घेतल्याने मान्य केले आहे. चौकशीदरम्यान, रावत यांनी सिक्कीम क्रिकेट संघटनेच्या निवड समितीचे सदस्य बिकाश प्रधान यांचेही नाव घेतले आहे. त्यांचे या प्रकरणातील घोटाळेबाजांशी संबंध असल्याची शंका आहे. गुरुग्राम पोलीस लवकरच त्यांना तपासामध्ये सहभागी होण्यासाठी नोटिस बजावण्याची शक्यता आहे. यादरम्यान, आशुतोष बोरा आणि कुलबीर रावत यांच्यातील चॅट रेकॉर्डमधून राज्य क्रिकेट संघाशी संबंधित काही मोठी नावे घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचे समोर येत आहे. (Lakhs Rupees cheats from cricketers in the name of giving chance in IPL & State teams )
द ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितले की, चॅटमध्ये यूपी क्रिकेट संघटनेचे निवड समिती सदस्य अक्रम खान, उपाध्यक्ष माहिम वर्मा आणि उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सीईओ अमन यांच्या नावांचा उल्लेख आहे. पोलिसांनी सांगितले की, चॅटमध्ये रावत यांनी हेसुद्धा संकेत दिले की, त्यांनी अनेकदा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड क्रिकेट संघाच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली आहे. आता पोलीस चॅटमध्ये उल्लेख असलेल्या नावांना नोटिस बजावण्याची तयारी करत आहेत. रावत यांच्या खात्यामध्ये आशुतोष बोरा यांच्या फर्मच्या खात्यामधून ३५ लाख रुपये ट्रान्सफर केले गेले आहेत. तर सिक्कीम क्रिकेट संघटनेचे निवड समिती सदस्य बिकास प्रधान यांना बोर यांच्या खात्यामधून २ लाखांहून अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. त्याशिवाय अरुणाचल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष नबाम विवेक यांचीही चौकशी होणार आहे.
गुरुग्राम पोलिसांनी युवा क्रिकेटपटूंकडून पैसे उकळणाऱ्या या टोळीचा ४ सप्टेंबर रोजी भांडाफोड केला होता. विविध स्पर्धांमध्ये निवड करण्याचे आमिष दाखवून हे लोक युवा क्रिकेटपटूंना लाखोंचा गंडा घालत असत. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ते क्रीडा व्यवस्थापन कंपनी सिक्योर कॉर्पोरेशन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक होते. तर अन्य तीन आरोपी फरार आहेत.
Web Title: IPL: Lakhs Rupees cheats from cricketers in the name of giving chance in IPL & State teams
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.