इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सर VIVOनं यंदा माघार घेण्याचा निर्णय घेतला. भारत-चीन सीमेवरील वादानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरही ( बीसीसीआय) दबाव वाढत होता. VIVOच्या या निर्णयामुळे बीसीसीआयला 440 कोटींवर पाणी सोडावे लागले आहे आणि आता रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीनं आयपीएल टायटल स्पॉन्सरशीपसाठी बोली लावण्याची उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे जर पतंजलीला स्पॉन्सरशीप मिळाली, तर कसा असेल IPLचा लोगो... (IPL logo after Patanjali becomes its title sponsor)
बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR
Vivo India ने 2018मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसार आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. त्यानुसार 2021, 2022 आणि 2023ला Vivo पुन्हा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून परतणार आहेत.
''यंदाच्या आयपीएलसाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवण्याचा आम्ही विचार करत आहोत. पतंजलीला जागतिक बाजारात ओळख मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे,''असे पतंजलीचे प्रवक्ता एस के तिजरवाल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले. बीसीसीआयकडे ते लवकरच प्रस्तावही पाठवणार आहेत. (IPL logo after Patanjali becomes its title sponsor)
या बातमीनंतर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एक ट्विट केलं आहे. पतंजलीला IPLचे टायटल स्पॉन्सरशिप मिळाल्यास लोगो कसा असेल, याबाबतचा फोटो त्यांनी पोस्ट केला.
बीसीसीआयनं ठेवली अट!
आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी बीसीसीआयने एक नवीन अट ठेवली आहे. ज्या कंपनीचा टर्नओव्हर हा 300 कोटींपेक्षा जास्त असेल त्याच कंपनीला आता आयपीएलच्या प्रायोजकत्वाच्या शर्यतीत कायम राहता येणार आहे. पतंजली या नियमाची पूर्तता करतानाचे चित्र आहे.
IPL म्हणजे अश्लील व जुगार
आयपीएल टायटल स्पॉन्सरशीपसाठी प्रयत्नशील असलेल्या बाबा रामदेव यांनी यापूर्वी आयपीएलवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "चीअरलीडर्समुळे क्रिकेट हा खेळ अश्लील झाला आहे. हे भारताच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. आयपीएल हा एक मोठा जुगार आहे, त्याचबरोबर आयपीएलमुळे सट्टेबाजी वाढत असल्याचेही पाहायला मिळत आहे.''