CSK vs RCB Match Live Updates | चेन्नई: चांगली सुरुवात झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव कोलमडला. आजपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आमनेसामने आहेत. (CSK vs RCB Live) आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (IPL 2024 Live) खेळ सुरू होताच डुप्लेसिसने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची धुलाई चालू केली. पण त्याची स्फोटक खेळी जास्त काळ टिकली नाही. मुस्तफिजुर रहमानने (Mustafizur Rahman) त्याला आपल्या जाळ्यात फसवून आरसीबीला पहिला झटका दिला. त्याच षटकात रजत पाटीदारला बाद करून रहमानने आणखी एक बळी घेतला. (Ajinkya Rahane Catch)
डुप्लेसिस (३५) धावा करून बाद झाला. तर ग्लेन मॅक्सवेल आणि पाटीदार यांना खातेही उघडता आले नाही. दीपक चाहरने मॅक्सवेलला बाद केल्यानंतर मुस्तफिजुरने कॅमरून ग्रीनचा त्रिफळा काढला. पण, विराट कोहली सावध खेळी करून डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र कोहलीच्या वाटेत अजिंक्य रहाणे नावाचा मोठा स्पीड ब्रेकर आला अन् आरसीबीला मोठा झटका बसला.
मुस्तफिजुरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या विराटचा रहाणेने अप्रितम झेल घेतला. सीमारेषेच्या दिशेने चेंडू कूच करत असताना त्याने झेल टिपला अन् त्याच्या मदतीला रचीन रवींद्र धावला. दोघांनी मिळून झेल पूर्ण केला. विराट कोहली २० चेंडूत २१ धावा करून बाद झाला.
आजच्या सामन्यासाठी CSK चा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.
आजच्या सामन्यासाठी RCB चा संघ - फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.