IPL 2024 CSK vs RCB Match: प्रथमच चेन्नई सुपर किंग्जच्या संघाची धुरा मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. आज शुक्रवारपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होत आहे. सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. (CSK vs RCB Live Match) महेंद्रसिंग धोनीने राजीनामा देऊन या पदासाठी ऋतुराजचे नाव पुढे केले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. (IPL 2024 news) चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची वर्णी लागली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शुक्रवारपासून सुरू होत आहे. (IPL live news)
दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडून मोठी चूक केली असल्याचे दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने म्हटले आहे. तो म्हणाला की, आयपीएलचा यंदा सतरावा हंगाम आहे आणि मला आशा आहे की, माझ्या जर्सीचा नंबर देखील १७ आहे. त्यामुळे आशा आहे की यंदा आरसीबी आयपीएल जिंकेल. मला वाटते की, धोनीने कर्णधारपद सोडून एक मोठी चूक केली आहे. तो जिओ सिनेमावर सामन्याचे विश्लेषण करत होता. डिव्हिलियर्स आरसीबीच्या संघाचा भाग राहिला आहे.
दरम्यान, कॅप्टन कूल धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने पाचवेळा ट्रॉफी जिंकली. याशिवाय सर्वाधिकवेळा अंतिम फेरीत प्रवेश करणारा संघ म्हणूनही चेन्नईच्या संघाची ख्याती आहे. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी सर्वाधिक पाचवेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाचवेळा किताब जिंकवून दिला. पण, मुंबईच्या फ्रँचायझीने रोहितला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवली आहे.