Join us  

IPL 2024 GT vs MI: अहमदाबादमध्ये एकच 'आव्वाज', रोहितचे 'हार्दिक' स्वागत; पांड्याला डिवचलं, Video

IPL 2024 GT vs MI Live Score Card: नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 8:27 PM

Open in App

IPL 2024 GT vs MI Live Updates In Marathi | अहमदाबाद: आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. (MI vs GT Live) दोन्हीही संघ प्रथमच नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत. हार्दिक पांड्याची मुंबईच्या संघात घरवापसी झाली (IPL 2024 Video) असून त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. तर शुबमन गिलच्या खांद्यावर गुजरातच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. (IPL 2024 News) हार्दिकला कर्णधारपद दिल्यामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे, जे अनेकदा पाहायला मिळाले आहे. (IPL 2024 Video) 

सामन्यादरम्यान देखील याचा प्रत्यय आला आणि चाहत्यांनी रोहित रोहितच्या घोषणा दिल्या. प्रेक्षक रोहितच्या घोषणा देत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. खरं तर हार्दिक कर्णधार असला तरी वेळोवेळी रोहित शर्मा हार्दिकला मार्गदर्शन करताना दिसला.

मुंईचा संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलाणी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.

गुजरातचा संघ -शुबमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेंसर जॉन्सन. 

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएची ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी हार्दिक पांड्याची घरवापसी झाली आहे. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने सलग दोन हंगामात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. २०२२ मध्ये हार्दिकसेनेने पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकण्याची किमया साधली. 

टॅग्स :हार्दिक पांड्याट्रोलरोहित शर्मामुंबई इंडियन्सगुजरात टायटन्स