IPL 2024 GT vs MI: पांड्याने टॉस जिंकला! मुंबईचे गुजरातमध्ये 'हार्दिक' स्वागत; कॅप्टननं आठवण सांगितली

IPL 2024 GT vs MI Live Score Card: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबाद येथे सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 07:05 PM2024-03-24T19:05:07+5:302024-03-24T19:05:14+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score GT vs MI Mumbai Indians captain Hardik Pandya won the toss and decided to bowl first | IPL 2024 GT vs MI: पांड्याने टॉस जिंकला! मुंबईचे गुजरातमध्ये 'हार्दिक' स्वागत; कॅप्टननं आठवण सांगितली

IPL 2024 GT vs MI: पांड्याने टॉस जिंकला! मुंबईचे गुजरातमध्ये 'हार्दिक' स्वागत; कॅप्टननं आठवण सांगितली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 GT vs MI Live Updates In Marathi | अहमदाबाद: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात बहुचर्चित सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. (IPL 2024 Live) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. प्रथमच दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत. (Hardik Pandya) हार्दिक पांड्याची मुंबईच्या संघात घरवापसी झाली असून त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे.  (GT vs MI) तर शुबमन गिल प्रथमच गुजरात टायटन्सच्या नेतृत्वात खेळत आहे. 

आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीवेळी बोलताना हार्दिक पांड्याने आठवणी सांगितल्या. तो म्हणाला की, जिथून क्रिकेटची, आयपीएलची सुरुवात केली तिथे मी पुन्हा आलो आहे. माझे जन्म ठिकाण हे गुजरात आहे, तर माझ्या क्रिकेटचे जन्म ठिकाण मुंबई आहे. आगामी काळातील आव्हानांसाठी मी उत्सुक आहे. इथे येऊन खूप छान वाटले. 

मुंबईचा संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलाणी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.

गुजरातचा संघ -
शुबमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेंसर जॉन्सन. 

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएची ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी हार्दिक पांड्याची घरवापसी झाली आहे. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने सलग दोन हंगामात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. २०२२ मध्ये हार्दिकसेनेने पदार्पणाच्या हंगामात किताब जिंकण्याची किमया साधली. 

Web Title: Ipl Match 2024 live score GT vs MI Mumbai Indians captain Hardik Pandya won the toss and decided to bowl first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.