IPL 2024 KKR vs SRH Live Updats In Marathi । कोलकाता: आंद्रे रसेलने स्फोटक खेळी केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात झाली असून कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात तिसरा सामना खेळवला जात आहे. आजच्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकून पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यजमान केकेआरने धावांचा डोंगर उभारला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. (IPL 2024 Videos) केकेआरने हैदराबादला विजयासाठी २०९ धावांचे तगडे आव्हान दिले. धावांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरच्या गोलंदाजांनी साजेशी कामगिरी केली.
हैदराबादचा सलामीवीर मयंक अग्रवाल चांगल्या लयनुसार खेळत होता. पण, वेगवान गोलंदाज हर्षित राणाने त्याला आपल्या जाळ्यात फसवले. रिंकू सिंगने अप्रतिम झेल घेऊन अग्रवालला बाहेरचा रस्ता दाखवला. तो २१ चेंडूत ३२ धावा करून तंबूत परतला. खरं तर अग्रवाल बाद होताच गोलंदाज राणाने भन्नाट सेलिब्रेशन केले. त्याने हातवारे करत खुन्नस दाखवली.
दरम्यान, हर्षित राणाच्या या सेलिब्रेशनचा दाखला देत नेटकरी केकेआरचा मार्गदर्शक गौतम गंभीरची फिरकी घेत आहेत. सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
केकेआरकडून सुरुवातीला फिल साल्ट (५४) आणि रमनदीप सिंग यांनी शानदार खेळी केली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या वादळाने हैदराबादच्या गोलंदाजांना धू धू धुतले. केकेआरकडून फिल साल्टने (५४) धावा केल्या, तर सुनील नरेन (२), व्यंकटेश अय्यर (७), श्रेयस अय्यर (०), नितीश राणा (९), रमनदीप सिंग (३५), रिंकू सिंग (२३) आणि आंद्रे रसेलने नाबाद ६४ धावा केल्या. केकेआरने निर्धारित २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या. रसेलने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २५ चेंडूत ६४ धावा कुटल्या.