IPL 2024 KKR vs SRH Live Updats In Marathi । कोलकाता: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू आज मैदानात आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH Live) यांच्यात सामना होत आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून मिचेल स्टार्कला (mitchell starc ipl 2024 price) ओळखले जाते. त्याला केकेआरच्या फ्रँचायझीने २४.७५ कोटी रूपयांत खरेदी केले. (IPL live score) तर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सवर (pat cummins ipl price) २०.५ कोटींचा वर्षाव झाला. आजच्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकून पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यजमान केकेआरने धावांचा डोंगर उभारला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. (IPL 2024 Videos) केकेआरने हैदराबादला विजयासाठी २०९ धावांचे तगडे आव्हान दिले आहे.
यजमान संघाकडून सुरुवातीला फिल साल्ट (५४) आणि रमनदीप सिंग यांनी शानदार खेळी केली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या वादळाने हैदराबादच्या गोलंदाजांना धू धू धुतले. केकेआरकडून फिल साल्टने (५४) धावा केल्या, तर सुनील नरेन (२), व्यंकटेश अय्यर (७), श्रेयस अय्यर (०), नितीश राणा (९), रमनदीप सिंग (३५), रिंकू सिंग (२३) आणि आंद्रे रसेलने नाबाद ६४ धावा केल्या. केकेआरने निर्धारित २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या. रसेलने ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २५ चेंडूत ६४ धावा कुटल्या.
आंद्रे रसेलने केवळ २० चेंडूत सहा षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या वादळी खेळीसमोर हैदराबादच्या कोणत्याच गोलंदाजाचा टिकाव लागला नाही. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक धावा दिल्या. त्याला एकही बळी घेता आला नाही. भुवीने त्याच्या निर्धारित ४ षटकांत ५१ धावा दिल्या, तर मार्को जान्सेन (४०), पॅट कमिन्स (३२), मयंक मार्कंडेय (३९) आणि नटराजनने (३२) धावा दिल्या.
KKR चा संघ -श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल साल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती.
SRH चा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि टी नटराजन,