IPL 2024 LSG vs PBKS Live Updats In Marathi । लखनौ: पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. नाणेफेक जिंकून यजमान लखनौच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. नियमित कर्णधार लोकेश राहुल आज 'इम्पॅक्ट' प्लेअरच्या रूपात दिसला. खरं तर राहुलने फलंदाजी केली असली तरी तो क्षेत्ररक्षण करताना दिसणार नाही. त्यामुळे विजयाचे खाते उघडण्याची जबाबदारी कर्णधार निकोलस पूरनच्या खांद्यावर आहे. लखनौने निर्धारित २० षटकांत ८ बाद १९९ धावा करून पंजाबला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले. (IPL 2024 News)
क्विंटन डीकॉक आणि लोकेश राहुल या जोडीने संथ खेळी करत डावाची सुरुवात केली. पण, राहुलला (१५) बाद करून अर्शदीप सिंगने लखनौला पहिला झटका दिला. त्यानंतर डीकॉकने मोर्चा सांभाळत अर्धशतकी खेळी केली. मग कर्णधार निकोलस पूरन आणि कृणाल पांड्या यांच्या खेळीच्या जोरावर यजमानांनी मजबूत धावसंख्या उभारली. लखनौकडून डीकॉकने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३८ चेंडूत सर्वाधिक ५४ धावा केल्या, तर राहुल (१५), देवदत्त पडिक्कल (९), मार्कस स्टॉयनिस (१९), निकोलस पूरन (४२), आयुष बदोनी (८), रवी बिश्नोई (०), मोहसिन खान (२) आणि कृणाल पांड्याने नाबाद (४३) धावा केल्या. पंजाब किंग्जकडून सॅम करनने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर अर्शदीप सिंग (२), कगिसो रबाडा आणि राहुल चहर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
दरम्यान, आयपीएलच्या सतराव्या हंगामातील अकरावा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. पंजाब यंदाच्या हंगामातील तिसरा तर लखनौ दुसरा सामना खेळत आहे. लोकेश राहुलचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. (LSG vs PBKS) शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाबने दिल्ली कॅपिटल्सला नमवून विजयी सलामी दिली. पण आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला. लखनौमधील इकाना स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. आजच्या सामन्यासाठी निकोलस पूरन लखनौचे कर्णधारपद सांभाळत आहे, तर राहुल इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात आहे.
पंजाब किंग्जचा संघ -
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग.
लखनौचा संघ -निकोलस पूरन (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मोहसिन खान, मणिमरम सिद्धार्थ.