IPL 2024 LSG vs PBKS Live Updats In Marathi। लखनौ: शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जला यंदाच्या हंगामातील सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पाठोपाठ लखनौ सुपर जायंट्सने पंजाबला पराभवाची धूळ चारली. कर्णधार शिखर धवनने एकतर्फी झुंज देताना ७० धावांची शानदार खेळी केली. त्याला जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली. पण लखनौकडून पदार्पण करत असलेला मयंक यादव (Mayank Yadav) पाहुण्या संघासाठी काळ ठरला. त्याने तीन बळी घेत पंजाबच्या फलंदाजीची कंबर मोडली. सामन्यानंतर बोलताना धवनने युवा मयंक यादवचे तोंडभरून कौतुक केले. (IPL 2024 News)
दरम्यान, २१ वर्षीय मयंक यादव (Mayank Yadav) पदार्पण'वीर' ठरला. त्याने त्याच्या IPL कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात कमाल करत सर्वात जलद गतीने चेंडू टाकण्याची किमया साधली. त्याने ४ षटकांत २७ धावा देत ३ बळी घेऊन सर्वांना प्रभावित केले. पंजाबचा संघ २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १७८ धावा करू शकला आणि २१ धावांनी सामना गमावला. सामन्यानंतर धवन म्हणाला की, विजयाचे श्रेय नक्कीच लखनौच्या गोलंदाजांना द्यावे लागेल. मयंक यादवने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीच्या वेगाने आमचा पराभव केला.
पंजाबचा सलग दुसरा पराभव
पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ५० चेंडूत ७० धावा कुटल्या. तर जॉनी बेअरस्टो (४२), सिमरन सिंग (१९), जितेश शर्मा (६), सॅम करन (०) आणि लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद (२८) धावा केल्या. लखनौकडून मयंक यादवने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर मोहसिन खानला (२) बळी घेण्यात यश आले.
लखनौकडून डीकॉकने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३८ चेंडूत सर्वाधिक ५४ धावा केल्या, तर राहुल (१५), देवदत्त पडिक्कल (९), मार्कस स्टॉयनिस (१९), निकोलस पूरन (४२), आयुष बदोनी (८), रवी बिश्नोई (०), मोहसिन खान (२) आणि कृणाल पांड्याने नाबाद (४३) धावा केल्या. लखनौने निर्धारित २० षटकांत ८ बाद १९९ धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जकडून सॅम करनने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर अर्शदीप सिंग (२), कगिसो रबाडा आणि राहुल चहर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
पंजाब किंग्जचा संघ -शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग.
लखनौचा संघ -निकोलस पूरन (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मोहसिन खान, मणिमरम सिद्धार्थ.