IPL 2024 PBKS vs DC Live Updats In Marathi | मोहाली: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. (DC vs PBKS Live) नाणेफेक जिंकून यजमान संघाचा कर्णधार शिखर धवनने दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. (Rishabh Pant Video) आजच्या सामन्यातून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचे तब्बल ४५३ दिवसांनंतर पुनरागमन झाले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातानंतर पंत क्रिकेटपासून दूर गेला. (IPL 2024 Live) पण, आज तो फलंदाजी आला तेव्हा चाहत्यांसह सर्व खेळाडूंनी उभे राहून त्याला दाद दिली. (IPL 2024 Videos)
डेव्हिड वॉर्नर बाद होताच रिषभ पंतची मैदानात एन्ट्री झाली. खेळाडूंसह चाहत्यांनी टाळ्या वाजवून पंतला शुभेच्छा दिल्या. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत असलेला आजचा सामना चंदीगड येथील नवीन स्टेडियमवर खेळवला जात आहे. यादविंद्र सिंह क्रिकेट स्टेडियम असे या मैदानाला नाव देण्यात आले आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानात ३६००० प्रेक्षक बसू शकतात. रिषभ पंतचे पुनरागमन अन् दिल्लीच्या फ्रँचायझीने एक इमोजी शेअर करत भावनिक प्रतिक्रिया दिली.
पंजाब किंग्जचा संघ -
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद आणि इशांत शर्मा.
Web Title: Ipl Match 2024 live score PBKS vs DC Delhi Capitals captain Rishabh Pant is back after 453 days
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.