IPL 2024 PBKS vs DC Live Updats In Marathi | मोहाली: दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने डावाच्या पहिल्याच षटकात १७ धावा कुटल्या. जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवनची जोडी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होती. (Ishant Sharma) पण, यजमान संघासाठी इशांत शर्मा काळ ठरला. अनुभवी भारतीय गोलंदाजाने त्याच्या दुसऱ्या षटकात धवनचा त्रिफळा तर बेअरस्टोला धावबाद केले. (Ishant Sharma Wickets) इशानने दुसऱ्या षटकात दोन बळी घेऊन आपल्या संघाचे पुनरागमन केले. पण सहाव्या षटकात क्षेत्ररक्षण करताना इशानचा पाय मुरगळला अन् त्याला मैदानाबाहेर व्हावे लागले. (IPL 2024 Videos)
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित २० षटकांत ९ बाद १७४ धावा केल्या. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर (२९), मिचेल मार्श (२०), शाई होप (३३), रिषभ पंत (१८), रिकी भुई (३), ट्रिस्टन स्टब्स (५), अक्षर पटेल (२०) आणि सुमित कुमारने (२) धावा केल्या. पाहुण्या संघाकडून होपने ३३ धावांची खेळी करून यजमानांना आव्हान दिले पण त्यालाही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मग दिल्लीने अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केला अन् त्याने शेवटचे षटक गाजवले. पंजाबकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी सर्वाधिक २-२ बळी घेतले, तर कगिसो रबाडा, हरप्रीत बरार आणि राहुल चाहर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. पंजाबसमोर विजयाने सुरुवात करण्यासाठी १७५ धावांचे आव्हान आहे.
पंजाब किंग्जचा संघ -
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद आणि इशांत शर्मा.
Web Title: Ipl Match 2024 live score PBKS vs DC Ishan Kishan took a hat trick off Punjab Kings captain Shikhar Dhawan, while Jonny Bairstow ran out but injured Ishant Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.