IPL 2024 PBKS vs DC Live Updats In Marathi | मोहाली: दिल्ली कॅपिटल्सला नमवून शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला. (PBKS vs DC) प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आले. मात्र, १७५ धावांचा बचाव करताना रिषभ पंतच्या (Rishab Pant) नेतृत्वातील संघाला अपयश आले. इशांत शर्माने एकाच षटकात शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांना बाद करून रंगत आणली. पण, सहाव्या षटकादरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली अन् दिल्लीला मोठा झटका बसला. (IPL 2024 Live) सॅम करनने ४७ चेंडूत ६३ धावा करून सामना आपल्या बाजूने फिरवला. (Sam Curren)
१९ व्या षटकात सॅम करनला बाद करण्यात खलील अहमदला यश आले. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर शशांक सिंगला बाद करण्याची किमया खलीलने साधली. खरं तर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने सोपा झेल सोडल्याने पंजाबच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. पंजाबला अखेरच्या षटकात विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती.
दिल्लीचा शानदार विजय
शेवटचे षटक सुमित कुमार टाकत होता. त्याने पहिले दोन चेंडू वाइड टाकल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव गेला. मग दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून लियाम लिव्हिंगस्टोनने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पंजाबने १९.२ षटकात ६ बाद १७७ धावा करून विजयाचे खाते उघडले. पंजाबकडून सॅम करनने सर्वाधिक (६३) धावा केल्या, तर लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद (३८) धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादव आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर इशांत शर्माला (१) बळी घेण्यात यश आले.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित २० षटकांत ९ बाद १७४ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर (२९), मिचेल मार्श (२०), शाई होप (३३), रिषभ पंत (१८), रिकी भुई (३), ट्रिस्टन स्टब्स (५), अक्षर पटेल (२०) आणि सुमित कुमारने (२) धावा केल्या. पाहुण्या संघाकडून होपने ३३ धावांची खेळी करून यजमानांना आव्हान दिले पण त्यालाही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. मग दिल्लीने अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केला अन् त्याने शेवटचे षटक गाजवले. पंजाबकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी सर्वाधिक २-२ बळी घेतले, तर कगिसो रबाडा, हरप्रीत बरार आणि राहुल चाहर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. पंजाबसमोर विजयाने सुरुवात करण्यासाठी १७५ धावांचे आव्हान होते, जे त्यांनी सहज गाठले.
अभिषेक पोरेलची खेळी व्यर्थ
दिल्लीकडून अखेरच्या षटकात इम्पॅक्ट प्लेअर अभिषेक पोरेलने चमकदार कामगिरी केली. पंजाबकडून शेवटचे षटक हर्षल पटेलने टाकले. २१ वर्षीय अभिषेकने या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. मग षटकार आणि आणखी एक चौकार मारून आपल्या चाहत्यांना जागे केले. चौथ्या चेंडूवर देखील चौकार मारून अभिषेकने आपली छाप सोडली. तसेच पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्याने हर्षलला घाम फोडला. अखेरच्या चेंडूवर दोन धावा काढण्याच्या प्रयत्नात असताना कुलदीप यादव धावबाद झाला. पण अभिषेकने ३२० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करून दिल्लीची धावसंख्या १७४ पर्यंत पोहोचवली. त्याने अखेरच्या षटकात २५ धावा कुटल्या. १० चेंडूत ३२ धावा करून अभिषेकने सन्मानजनक धावसंख्या उभारली पण दिल्लीला विजय मिळवता आला नाही.
पंजाब किंग्जचा संघ - शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद आणि इशांत शर्मा.