IPL 2024 RCB vs KKR Live Updates In Marathi | बंगळुरू: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील दहावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे सर्व सामने यजमान संघाने जिंकले. आज आरसीबी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या मैदानावर अर्थात चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळत आहे. (IPL 2024 News) लक्षणीय बाब म्हणजे २०१६ पासून आरसीबीने एकदाही या मैदानावर केकेआरचा पराभव केला नाही.
आजच्या सामन्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीवेळी रवी शास्त्री यांनी केकेआरचा कर्णधार अय्यरला संघात काय बदल असेल याबाबत विचारणा केली. यावेळी अय्यर गडबडला अन् एकच हशा पिकला. मी पण संभ्रमात पडलो असल्याचे त्याने सांगितले. केकेआरने आजच्या सामन्यासाठी अनुकूल रायला संधी दिली आहे, तर आरसीबीने एकही बदल केला नाही.
दरम्यान, केकेआर आज आपला दुसरा तर आरसीबी तिसरा सामना खेळत आहे. आरसीबीला आपल्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव केला. केकेआरने आपल्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादला नमवून विजयी सलामी दिली.
KKR चा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल साल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती, अनुकूल राय.
RCB चा संघ -
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.
Web Title: Ipl Match 2024 live score RCB vs KKR Kolkata Knight Riders captain Shreyas Iyer has won the toss and elected to bowl first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.