IPL 2024 RCB vs KKR Live Updates In Marathi | बंगळुरू: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ भिडले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर आरसीबीने चांगली सुरुवात केली. या सामन्यातील आरसीबीच्या डावात यजमान संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. खरं तर आयपीएलच्या इतिहास १५०० हून अधिक षटकार ठोकणारा आरसीबी हा दुसरा संघ ठरला आहे. या यादीत मुंबई इंडियन्स पहिल्या क्रमांकावर आहे. (IPL 2024 News)
दरम्यान, केकेआर आज आपला दुसरा तर आरसीबी तिसरा सामना खेळत आहे. आरसीबीला आपल्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा पराभव केला. केकेआरने आपल्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादला नमवून विजयी सलामी दिली.
एका संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू -
- विराट कोहली (RCB) - २४०* षटकार
- ख्रिस गेल - (RCB) - २३९ षटकार
- एबी डिव्हिलियर्स - (RCB) - २३८ षटकार
- किरॉन पोलार्ड (MI) - २२३ षटकार
- रोहित शर्मा (MI) - २१० षटकार
- महेंद्रसिंग धोनी (CSK) - २०९ षटकार
KKR चा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल साल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती, अनुकूल राय.
RCB चा संघ -
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.
Web Title: Ipl Match 2024 live score RCB vs KKR royal challengers bengaluru completed 1500 sixes in ipl history 2nd franchise after Mumbai Indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.