IPL 2024 RCB vs PBKS: 'गब्बर' एकटा भिडला! टीकाकारांना उत्तर देण्यात RCB च्या दयालला 'यश'

IPL 2024 RCB vs PBKS Live Score Card: पंजाब किंग्जने आरसीबीला विजयासाठी १७७ धावांचे आव्हान दिले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 09:14 PM2024-03-25T21:14:40+5:302024-03-25T21:14:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL Match 2024 live score RCB vs PBKS Punjab Kings set Royal Challengers Bangalore a target of 177 runs to win, Shikhar Dhawan scores 45 | IPL 2024 RCB vs PBKS: 'गब्बर' एकटा भिडला! टीकाकारांना उत्तर देण्यात RCB च्या दयालला 'यश'

IPL 2024 RCB vs PBKS: 'गब्बर' एकटा भिडला! टीकाकारांना उत्तर देण्यात RCB च्या दयालला 'यश'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 RCB vs PBKS Live Updates In Marathi | बंगळुरू: दिल्ली कॅपिटल्सला नमवून आलेला पंजाब किंग्जचा संघ आपल्या दुसऱ्या विजयासाठी मैदानात आहे. तर चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर विजयाचे खाते उघडण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रयत्नशील आहे. (RCB vs PBKS) आरसीबी आपल्या घरात आज सामना खेळत असून पंजाबने यजमानांना विजयासाठी १७७ धावांचे आव्हान दिले आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सहावा सामना (RCB vs PBKS Live) पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या. (IPL 2024 News) पंजाब किंग्जने आरसीबीला विजयाचे खाते उघडण्यासाठी १७७ धावांचे लक्ष्य दिले आहे. 

नाणेफेक जिंकून यजमान आरसीबीने पाहुण्या पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंजाबला जॉनी बेअरस्टोच्या रूपात सुरुवातीलाच एक मोठा झटका बसला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने मोर्चा सांभाळला. त्याने सावध खेळी करत डाव पुढे नेला, ज्याला सिमरन सिंगने साथ दिली. पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक (४५) धावा केल्या, तर जॉनी बेअरस्टो (८), सिमरन सिंग (२५), लियाम लिव्हिंगस्टोन (१७), सॅम करन (२३), जितेश शर्माने (२७) धावा केल्या. अखेरीस शशांक सिंगने २० चेंडूत २७ धावांची नाबाद खेळी केली. 

मागील आयपीएल हंगामात रिंकू सिंगने एकाच षटकात पाच षटकार ठोकल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या यश दयालने आज चमक दाखवली. त्याने त्याच्या ४ षटकांत केवळ २३ धावा देत १ बळी घेतला. त्याने सॅम करनला बाहेरचा रस्ता दाखवला. आरसीबीकडून मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सेवल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. तर यश दयाल आणि अल्झारी जोसेफ यांनी १-१ बळी घेतला. 

पंजाब किंग्जचा संघ -
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग. 

बंगळुरूचा संघ -
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज. 

Web Title: IPL Match 2024 live score RCB vs PBKS Punjab Kings set Royal Challengers Bangalore a target of 177 runs to win, Shikhar Dhawan scores 45

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.