IPL 2024 RCB vs PBKS: RCB चा 'रॉयल' विजय! किंग कोहलीची 'विराट' खेळी; दिनेश कार्तिक 'फिनिशर'

IPL 2024 RCB vs PBKS Live Score Card: आरसीबीने पंजाब किंग्जविरूद्ध ४ गडी राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 11:19 PM2024-03-25T23:19:59+5:302024-03-25T23:20:06+5:30

whatsapp join usJoin us
 Ipl Match 2024 live score RCB vs PBKS Royal Challengers Bangalore beat Punjab Kings by 4 wickets | IPL 2024 RCB vs PBKS: RCB चा 'रॉयल' विजय! किंग कोहलीची 'विराट' खेळी; दिनेश कार्तिक 'फिनिशर'

IPL 2024 RCB vs PBKS: RCB चा 'रॉयल' विजय! किंग कोहलीची 'विराट' खेळी; दिनेश कार्तिक 'फिनिशर'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 RCB vs PBKS Live Updates In Marathi | बंगळुरू: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (PBKS vs RCB Live) यांच्यात खेळवला गेला. आरसीबीला आपल्या सलामीच्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, पंजाब किंग्जला नमवून आरसीबीने  विजयाचे खाते उघडले. पंजाबने दिलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांकडून विराट कोहलीने अप्रतिम खेळी केली. मग अखेर दिनेश कार्तिकने कमाल करत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. आरसीबीने १९.२ षटकांत ६ बाद १७८ धावा करून विजय साकारला. (IPL 2024 News)  

आरसीबीला अखेरच्या १२ चेंडूंमध्ये विजयासाठी २३ धावांची गरज होती. पंजाबकडून हर्षल पटेल एकोणिसावे षटक घेऊन आला. या षटकातील पहिल्या चेंडूवर आरसीबीला एक धाव मिळाली अन् दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला. पण चेंडू वाइड गेल्याने यजमानांना एक धाव मोफत मिळाली. त्याच्या पुढचा चेंडू निर्धाव गेला मग १० चेंडूत २१ धावांची गरज होती. कार्तिकने चौकार ठोकून धावांचे अंतर कमी केले. ९ चेंडूंत १७ धावांची आवश्यकता असताना पुढचा चेंडू निर्धाव गेला आणि सामन्यात आणखी ट्विस्ट आला. कार्तिकने एकोणिसाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून घरच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी.

अखेरच्या ७ चेंडूंत आरसीबीला ११ धावांची गरज होती. मग कार्तिकने एक धाव काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. अखेरचे षटक अर्शदीप सिंग घेऊन आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर दिनेश कार्तिकने अप्रतिम षटकार ठोकला. पुढचा चेंडू वाइड गेल्याने ५ चेंडूंत ३ धावा हव्या होत्या. त्याच्या पुढच्याच चेंडूवर कार्तिकने चौकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने १० चेंडूत नाबाद २८ धावांची मॅचविनिंग खेळी केली. 

खरं तर विराट कोहली ट्वेंटी-२० मध्ये १०० हून अधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने पंजाबविरूद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून ही किमया साधली. आपला संघ अडचणीत असताना विराटने अप्रतिम खेळी करून डाव सावरला. पंजाबविरूद्ध त्याने २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ७७ धावा कुटल्या. 

आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक (७७) धावा केल्या, तर फाफ डुप्लेसिस (३), कॅमरून ग्रीन (३), रजत पाटीदार (१८), ग्लेन मॅक्सवेल (३), अनुज रावत (११), दिनेश कार्तिक (नाबाद २८ धावा) आणि महिपाल लोमरोरने नाबाद (१७) धावा केल्या. पंजाबकडून कगिसो रबाडा आणि हरप्रीत बरार यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला, तर सॅम करन आणि हर्षल पटेल यांना १-१ बळी घेण्यात यश आले. 

तत्पुर्वी, आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबला जॉनी बेअरस्टोच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने मोर्चा सांभाळला. त्याने सावध खेळी करत डाव पुढे नेला, ज्याला सिमरन सिंगने साथ दिली. पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक (४५) धावा केल्या, तर जॉनी बेअरस्टो (८), सिमरन सिंग (२५), लियाम लिव्हिंगस्टोन (१७), सॅम करन (२३), जितेश शर्माने (२७) धावा केल्या. अखेरीस शशांक सिंगने २० चेंडूत २७ धावांची नाबाद खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या.

पंजाब किंग्जचा संघ -

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग. 

बंगळुरूचा संघ -
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.  

Web Title:  Ipl Match 2024 live score RCB vs PBKS Royal Challengers Bangalore beat Punjab Kings by 4 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.