IPL 2024 RCB vs PBKS Live Updates In Marathi | बंगळुरू: आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिखर धवनचा पंजाब किंग्जचा संघ प्रथम फलंदाजी करेल. (IPL 2024 Live) पंजाबच्या संघाने आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजयी सलामी दिली. तर आरसीबीला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला.
अलीकडेच पार पडलेल्या महिला प्रीमिअर लीगमध्ये (WPL 2024) आरसीबीच्या महिला संघाने विजय मिळवला. याबद्दल नाणेफेकीवेळी कर्णधार फाफ डुप्लेसिला प्रश्न विचारला असता त्याने भारी उत्तर दिले. आरसीबीच्या महिला संघाने WPL जिंकली याचा दबाव आहे का? यावर फाफ म्हणाला की, आमच्या महिला संघाने जेतेपद जिंकले याचा आनंद आहे. आम्ही एकदाही ट्रॉफी जिंकली नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही देखील जेतेपद जिंकू... यासाठी प्रयत्न सुरू आहे.
पंजाब किंग्जचा संघ -
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग.
बंगळुरूचा संघ -
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.
Web Title: Ipl Match 2024 live score RCB vs PBKS Royal Challengers Bangalore won the toss and elected to bowl first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.