IPL 2024 RCB vs PBKS Live Updates In Marathi: पंजाब किंग्जला नमवून आरसीबीने विजयाचे खाते उघडले. पंजाबने दिलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांकडून विराट कोहलीने अप्रतिम खेळी केली. मग अखेर दिनेश कार्तिकने कमाल करत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. आरसीबीने १९.२ षटकांत ६ बाद १७८ धावा करून विजय साकारला. (IPL 2024 News) आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्याने त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये विराट कोहलीने जोरदार बॅटिंग करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तो म्हणाला की, मी कोणत्याही कॅप्ससाठी खेळत नाही. आज ऑरेंज कॅप माझ्या डोक्यावर असली तरी जास्त हुरळून जायची गरज नाही कारण केवळ दोन सामने झाले आहेत. मला माहित आहे की आपल्याला खूप पुढे जायचे आहे मी कोणत्या कॅप्ससाठी नसून केवळ संघासाठी खेळतो. माझे ध्येय संघासाठी चांगली कामगिरी करणे हे आहे. मागील दोन महिन्यांनंतर पुनरागमन केल्याने चांगले वाटते आहे. अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकू शकलो नाही त्यामुळे निराश आहे पण आम्हाला विजय मिळाला याचा आनंद आहे.
आरसीबीचा 'रॉयल' विजय
अखेरच्या ७ चेंडूंत आरसीबीला ११ धावांची गरज होती. मग कार्तिकने एक धाव काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. अखेरचे षटक अर्शदीप सिंग घेऊन आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर दिनेश कार्तिकने अप्रतिम षटकार ठोकला. पुढचा चेंडू वाइड गेल्याने ५ चेंडूंत ३ धावा हव्या होत्या. त्याच्या पुढच्याच चेंडूवर कार्तिकने चौकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने १० चेंडूत नाबाद २८ धावांची मॅचविनिंग खेळी केली. आरसीबीने १९.२ षटकांत ६ बाद १७८ धावा करून विजय साकारला.
खरं तर विराट कोहली ट्वेंटी-२० मध्ये १०० हून अधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने पंजाबविरूद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून ही किमया साधली. आपला संघ अडचणीत असताना विराटने अप्रतिम खेळी करून डाव सावरला. पंजाबविरूद्ध त्याने २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ७७ धावा कुटल्या.
Web Title: Ipl Match 2024 live score RCB vs PBKS Virat Kohli said I don't play for these caps, my aim is to perform for my team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.