Join us

IPL 2024 RR vs DC: दिल्लीने टॉस जिंकला! पंतसाठी ऐतिहासिक सामना, पृथ्वी शॉ पुन्हा बाकावर

IPL 2024 RR vs DC Live Score Card: आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 19:06 IST

Open in App

IPL 2024 RR vs DC Live Match Updates In Marathi | जयपूर: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील नववा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) यांच्यात होत आहे. दिल्ली कॅपिटल्स आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे, तर राजस्थान सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत दिल्लीच्या फ्रँचायझीसाठी आज १०० वा सामना खेळत आहेत. दिल्लीसाठी १०० सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. (IPL 2024 News) 

आजच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा २० धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. तर पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सला आपल्या सलामीच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. पृथ्वी शॉला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

दिल्लीचा संघ -

रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद आणि एनरिक नॉर्तजे.

राजस्थानचा संघ - 

संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.

टॅग्स :दिल्ली कॅपिटल्सरिषभ पंतराजस्थान रॉयल्सपृथ्वी शॉ