IPL 2024 RR vs DC: नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर स्वस्तात परतल्यामुळे यजमान संघावर दबाव आला. मग राजस्थानच्या संघाने संथ गतीने धावा करत पॉवरप्ले संपवला. कर्णधार संजू सॅमसनला देखील काही खास करता आले नाही. पण, मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या रियान परागने मैदान गाजवले. त्याने अर्धशतकी खेळी करून घरच्या चाहत्यांना जागे केले. त्याला आर अश्विन आणि ध्रुव जुरेल यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला. राजस्थानने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या. (IPL 2024 News)
आयपीएलच्या सतराव्या हंगामातील नववा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १८५ धावा केल्या. यजमान संघाकडून रियान परागने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ४५ चेंडूत ६ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा कुटल्या. तर, यशस्वी जैस्वाल (५), जोस बटलर (११), संजू सॅमसन (१५), आर अश्विन (२९), ध्रुव जुरेल (२०) आणि शिमरोम हेटमायरने नाबाद १४ धावा केल्या. दिल्लीकडून प्रत्येक गोलंदाजाला १-१ बळी घेण्यात यश आले. खलील अहमद, मुकेश कुमार, एनरिक नॉर्तजे, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी सांघिक खेळी केली. रियान परागने एनरिक नॉर्तजेची चांगलीच धुलाई केली. दिल्लीकडून अखेरचे षटक घेऊन आलेल्या नॉर्तजेच्या या षटकात परागने २५ धावा खेचल्या. त्याने ४,४,६,४,६ आणि अखेरच्या चेंडूवर १ धाव काढली.
तत्पुर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा २० धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. तर पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सला आपल्या सलामीच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. पृथ्वी शॉला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
दिल्लीचा संघ -
रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, मुकेश कुमार, खलील अहमद आणि एनरिक नॉर्तजे.
राजस्थानचा संघ -
संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.
Web Title: Ipl Match 2024 live score RR vs DC Delhi Capitals set Rajasthan Royals a target of 186 to win, Ryan Parag hits 84 not out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.