IPL 2024 RR vs LSG Live Score Card: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील चौथा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (RR vs LSG) यांच्यात खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून संजू सॅमसनच्या (Sanju Samson) संघाने प्रथम फलंदाजी करताना सन्मानजनक धावसंख्या उभारली. राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल (२४) आणि जोस बटलर (११) स्वस्तात तंबूत परतल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने मोर्चा सांभाळला. सॅमसनने स्फोटक खेळी करून राजस्थानची धावसंख्या १९३ पर्यंत पोहोचवली.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १९३ धावा केल्या. सॅमसनने ६ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५२ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली. त्याला रियान परागने (४३) चांगली साथ दिली. लखनौकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक २ बळी घेतले, तर मोहसिन खान आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी १-१ बळी घेतला.
लखनौचा कर्णधार लोकेश राहुल मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळे तो इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील चार सामन्यांना मुकला होता.
लखनौचा संघ -लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मोहसिन खान. राजस्थानचा संघ - संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.