नवी दिल्ली : कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएलच्या १४ व्या पर्वातील ३१ सामने इंग्लंडऐवजी यूएईत करण्यास बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन हे अनुकूल आहेत. अमीन हे आयपीएलचेदेखील सीईओ आहेत. २९ मे रोजी होणाऱ्या बोर्डाच्या विशेष आमसभेत या आशयाचा प्रस्ताव ते मांडतील.
टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारताऐवजी यूएईत झाले तरच आयपीएल सामने इंग्लंडमध्ये होऊ शकतील, असे त्यांचे मत आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयपीएलचे उर्वरित सामने तसेच भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी एसजीएमचे आयोजन केले आहे. आयपीएलसाठी सप्टेंबर महिन्यात तीन आठवड्यांची विंडो मिळेल का, हा एकमेव अडथळा आयोजकांपुढे आहे.
यूएईत आयोजन का?
यूएईत आयपीएल सामने झाल्यास इंग्लंडच्या तुलनेत खर्च कमी होईल. इंग्लंडमध्ये हॉटेल, स्टेडियम यावर होणारा खर्च यूएईच्या तुलनेत अधिक आहे. यूएईत संघ रस्त्याने स्टेडियमपर्यंत सहज पोहोचू शकतात. इंग्लंडमध्ये मात्र प्रवास खर्च मोठा आहे. अधिक प्रवासामुळे कोरोनाची भीती अधिक असेल.
इंग्लंडमध्ये सप्टेंबरमध्ये लहरी हवामान असते. पावसामुळे अनेक सामने रद्द होऊ शकतात. यूएईत सप्टेंबरमध्ये थंडीमुळे खेळाडू आणि स्टाफ यांना खेळणे सोपे होईल. आयपीएलचे आयोजन यूएईत करण्याचा अनुभव आहे. तेथील आव्हानांवर मात करण्याची तयारीदेखील आहे. इंग्लंडमध्ये अद्याप आयपीएलचे आयोजन झालेले नाही. कोरोनामुळे वेगवेगळ्या शहरात असलेल्या प्रोटोकॉलची माहिती नसेल. दुबई आणि अबुधाबी येथे ही समस्या उद्भवणार नाही.
Web Title: IPL matches should be played in UAE only; BCCI CEO Hemang Amin's opinion
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.