मुंबई : पुढील वर्षातील इंडियन प्रीमियर लीगमध्ये बरेच बदल पाहण्यास मिळणार असून, खेळाडूंच्या अदलाबदलीसह संघांच्या संख्येत होणारी वाढ क्रिकेटचाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. त्यातही २०२०च्या मोसमात ‘पॉवर प्लेयर’ ही नवी संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रतिस्पर्धी संघांना सामन्यापूर्वी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर करावा लागेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पॉवर प्लेयर संकल्पनेला मान्यता मिळाली असून, या संदर्भात मंगळवारी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत चर्चा होईल. अधिकाºयाने पुढे माहिती दिली की, ‘या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला सामन्यापूर्वी ११ खेळाडूंऐवजी १५ खेळाडूंचा संघ जाहीर करावा लागेल. त्यानुसार, बळी गेल्यानंतर किंवा सामन्यातील एका टप्प्यानंतर बदली खेळाडूला मैदानावर उतरविण्यात येऊ शकेल. ही संकल्पना आयपीएलमध्ये लागू करण्याचा प्रयत्न असून, या संकल्पनेचा प्रयोग आगामी मुश्ताक अली चषक स्पर्धेत केला जाईल.’
बीसीसीआय अधिकाºयाने पुढे सांगितले की, ‘पॉवर प्लेयर नियमामुळे सामन्यातील चुरस आणखी वाढेल, तसेच हा निर्णय सामन्याला कलाटणी देणाराही ठरू शकतो. यामुळे प्रेक्षकांना आणखी खिळवून ठेवता येईल. उदाहरण द्यायचे झाल्यास संघाला ६ चेंडूत २० धावांची गरज आहे आणि डगआउटमध्ये काही कारणास्तव अंतिम ११मध्ये स्थान न मिळालेला आंद्रे रसेलसारखा आक्रमक खेळाडू बसला आहे, तर पॉवर प्लेयर नियमानुसार तुम्ही त्याला फलंदाजीची संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे, गरजेनुसार हुकमी गोलंदाजालाही निर्णायक क्षणी खेळविण्यात येऊ शकते. या बदली खेळाडूच्या जोरावर संघाला सामन्याचे चित्र पालटता येईल.’आयपीएल संचालन परिषदेच्या वरीष्ठ कार्यकारिणीमध्ये काही महिन्यापूर्वी पारंपरिक इलेव्हनसह अन्यप्रकारे संघ तयार करण्याची योजना आखण्यात आली. त्यात ‘पॉवर प्लेयर’चा उल्लेख आहे. यानुसार हा खेळाडू अंतिम ११ मध्ये नसताना फलंदाजी किंवा गोलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो.गांगुली घेणार अंतिम निर्णयपर्यायी खेळाडूला संधी देण्याबाबत बुधवारी मुंबईत होणाºया संचालन परिषदेच्या बैठकीत चर्चा होवू शकते, पण याबाबत अंतिम निर्णय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली घेतील. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘अंतिम निर्णय बीसीसीआयचे अध्यक्ष घेतील. ते आयपीएल संचालन परिषदचे चेअरमन बृजेश पटेल व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील, पण त्यासाठी अनेक बाबींचा विचार करावा लागेल.’ यावर मत व्यक्त करण्यासाठी गांगुली उपलब्ध नव्हते, पण सूत्रांनी सांगितले की, ‘ही बाब लागू करण्यासाठी अनेक शंका आहेत कारण त्यामुळे क्रिकेटच्या मुळ ढाच्यात बदल होईल.’ सूत्राने सांगितले की, ‘अद्याप काही निर्णय झालेला नाही. मुश्ताक अली स्पर्धेला चार दिवस शिल्लक असताना असा बदल लागू होण्याची आम्हाला कल्पना नाही. आयपीएल संचालन परिषदेतील एक गट असा आहे की, ९ नोव्हेंबरपासून सुरु होणाºया राष्ट्रीय टी२० स्पर्धा सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत या बदलाचा प्रभाव बघण्यास उत्सुक आहे, पण एका गटाच्या मते यामुळे वयस्कर खेळाडूंच्या आयपीएल फ्रेंचायझीला याचा लाभ होईल.