IPL Media Rights: BCCI च्या हाती 'कुबेरा'चा खजिना!; एका चेंडूसाठी मिळणार 49 लाख,  2.95 कोटींची ओव्हर अन्... 

IPL Media Rights : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2023 ते 2027 या कालावधीचे मीडिया राईट्स 48,390 कोटींना विकले गेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 04:30 PM2022-06-15T16:30:48+5:302022-06-15T16:39:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL Media Rights : 49 lakh for each ball bowled, 2.95 crore for per-over; numbers behind IPL 2023-27 media rights auction | IPL Media Rights: BCCI च्या हाती 'कुबेरा'चा खजिना!; एका चेंडूसाठी मिळणार 49 लाख,  2.95 कोटींची ओव्हर अन्... 

IPL Media Rights: BCCI च्या हाती 'कुबेरा'चा खजिना!; एका चेंडूसाठी मिळणार 49 लाख,  2.95 कोटींची ओव्हर अन्... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Media Rights : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2023 ते 2027 या कालावधीचे मीडिया राईट्स 48,390 कोटींना विकले गेले आहेत. स्टार स्पोर्ट्सने 23,575 कोटी मोजून पाच वर्षांसाठी टीव्ही प्रसारणाचे हक्क स्वतःकडे कायम राखले, तर डिजिटलसाठी रिलायन्सच्या Viacom ने 20,500 कोटी मोजले. Viacom ने पॅकेज सी व डी यातही गुंतवणूक केली आहे. बीसीसीआयला मिळालेल्या या कुबेराच्या खजन्यामुळे आयपीएलमधील आता एका चेंडूची किंमत 49 लाख झाली आहे, तर एक षटक 2.95 कोटींचे असणार आहे. 

2023पासून प्रत्येक आयपीएल सामन्यातून BCCI 118 कोटींची कमाई करणार आहे. 2018 साली स्टार इंडियाने मिळवलेल्या पाच वर्षांसाठीच्या हक्कांनुसार एका सामन्यासाठीची किंमत 60 कोटी होती. वायकॉमने पॅकेज सी जिंकून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड क्षेत्रातील हक्क खरेदी केले, तर टाईम्स इंटरनेटला अमेरिकेतील प्रक्षेपणाचे राईट्स मिळाले आहेत.  

  • 48,390 कोटी, 410 सामने 
  • प्रती सामना 118 कोटी
  • प्रती षटक 2.95 कोटी
  • प्रती चेंडू 49 लाख 

  
कोणी कोणते हक्क जिंकले?

  • Package A: २३,५७५ कोटी ( ५७.४० कोटी प्रती सामना, एकूण ४१० सामने )  - Star
  • Package B: २०,५०० कोटी ( ५७ कोटी प्रती सामना, एकूण ४१० सामने )  - Viacom
  • Package C: २,९९१ कोटी ( ३३.२४ कोटी प्रती सामना, एकूण ९८ सामने) - Viacom
  • Package D: १३२४ कोटी  - Viacom & Times Internet   

Web Title: IPL Media Rights : 49 lakh for each ball bowled, 2.95 crore for per-over; numbers behind IPL 2023-27 media rights auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.