IPL Media Rights: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) आयपीएल 2023 ते 2027 या कालावधीसाठी झालेल्या ब्रॉडकास्टींग व डिजिटल ई लिलावातून 44,075 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बीसीसीआयला बम्पर लॉटरी लागल्यानंतर आता आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचेही खिसे भरणार आहेत. आयपीएल 2023 पासून फ्रँचायझीच्या प्लेअर पर्समध्ये दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे आता लिलावात एका खेळाडूसाठी 20 ते 25 कोटींपर्यंत बोली लागल्यास आश्चर्य वाटायला नको.
धन धना धन...!; IPL 2023-27 च्या प्रसारण हक्कातून BCCIला मिळाले 44,075 कोटी; Hotstar ग्राहकांना धक्का
सध्या आयपीएल लिलावासाठी प्रत्येक फ्रँचायझीला 90 कोटींची प्लेअर पर्स दिली जात आहे आणि आता त्यात 100 कोटींपर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, InsideSport ने दिलेल्या वृत्तानुसार पर्स रक्कम 90 कोटींहून 170 कोटींपर्यंत म्हणजेच दुप्पट करण्यात येणार आहे. आयपीएल 2023साठी जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या मिनी ऑक्शनमध्ये होणार आहे आणि त्यात 170 कोटी पर्स दिली जाऊ शकते.
8,200 कोटी ते 16347 कोटी अन् आता थेट 23,575 कोटी!
२००८ साली जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली तेव्हा क्लोजिंग बीडद्वारे (गुप्त बोली) पहिल्या दहा वर्षांसाठी या स्पर्धेचे टीव्ही प्रसारणासाठीचे हक्क सोनी या कंपनीने ८२०० कोटींना विकत घेतले होते. त्यानंतर २०१७ ला स्टार स्पोर्ट्सने १६,३४७ कोटींची बोली लावत टीव्ही आणि डिजिटलचे प्रसारण हक्क स्वत:च्या ताब्यात घेतले. क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वात मोठी बोली होती. २००८ ते २०१७ या कालावधीसाठी सोनी इंडियाने ८२०० कोटी मोजले होते, तर २०१८ ते २०२२ या कालावधीसाठी स्टार स्पोर्ट्सने १६,३४७ कोटी मोजले.
- आयपीएल 2023-27 प्रसारण हक्कासाठीच्या A व B पॅकेजसाठी एकूण 44,075 कोटींची बोली लागली.
- टीव्हीवरील प्रसारण हक्कासाठी प्रती सामना 57.5 कोटी म्हणजेच एकूण 23,575 कोटींची बोली निश्चित झाली.
- डिजिटल प्रसारण हक्कासाठी प्रती सामना 50 कोटी म्हणजेच एकूण 20,500 कोटी रुपये मोजले जातील.