मुंबई:आयपीएल 2022 च्या लिलावानंतर आता आयपीएलच्या मीडिया राईटसाठी बोली लागणार आहे. यासाठी जगातील अनेक मोठ्या ब्रॉडकास्टिंग कंपन्यांमध्ये स्पर्धा असेल. Disney India, Sony Pictures Networks India, Viacom18 आणि Amazon India सारख्या बड्या कंपन्या IPL मीडिया राईट्स मिळवण्याच्या तयारीत आहेत.
यावर्षी स्टारचा करार संपेल
बीसीसीआय मीडिया राईट्सच्या लिलावासाठी निविदा दस्तऐवज तयार करत आहे. आयपीएल सामन्यांच्या मीडिया राईट्ससाठी मागच्या वेळेपेक्षा यावेळेस तिप्पट पैसे खर्च केले जातील, असे मानले जात आहे. सध्या आयपीएलचे मीडिया हक्क स्टार इंडियाकडे आहेत. त्यांनी 2018 ते 2022 या पाच वर्षांसाठी 16,347.50 कोटी रुपयांना हक्क विकत घेतले होते. स्टारचा करार एप्रिल-मे 2022 मध्ये संपत आहे.
50 हजार कोटींच्या बोलीचा अंदाज
इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, 2023 ते 2027 दरम्यान IPL प्रसारणासाठी 50 हजार कोटी रुपये खर्च केले जाऊ शकतात. पुढील पाच वर्षांसाठी दोन-तीन महिन्यांत लिलाव होऊ शकतो. एका सल्लागार कंपनीचा हवाला देत अहवालात असे लिहिले आहे की, यावेळी आयपीएल अधिकारांचे मूल्य कोणत्याही अंदाजापेक्षा जास्त असेल.
2008 मध्ये 8200 कोटींना हक्क विकले गेले
2008 मध्ये जेव्हा IPL सुरु झाले तेव्हा BCCI ने 10 वर्षांसाठी IPL चे हक्क पहिल्यांदा 8200 कोटी रुपयांना विकले होते. तेव्हा सोनी पिक्चर्स नेटवर्कला हे अधिकार मिळाले होते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही म्हटले आहे की, आयपीएलचे हक्क 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंतीत जाऊ शकतात. पुढील 10 दिवसांत आयपीएल मीडिया हक्कांसाठी बीसीसीआयकडून निविदांचे आमंत्रण जारी केले जाईल. यावेळी बोलीसाठी ई-लिलाव घेण्यात येणार आहे.
Web Title: IPL Media Rights: BCCI would get 50,000 crore for IPL media rights
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.