IPL Media Rights LIVE UPDATES : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ ते २०२७ या ५ वर्षांच्या कालवधीसाठी आज प्रसारण हक्कांचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे आणि हा ई-लिलाव सुरू आहे. Disney Star vs Sony Network vs Reliance Viacom18 यांच्यात खरी टक्कर सुरू आहे, तर ZEE डिजिटल राईट्ससाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. Amazon व Google यांनी या लिलिव प्रक्रियेतून माघार घेतल्याने रिलायन्सचे सर्वसर्वा मुकेश अंबानी यांच्यासमोरील तगडे प्रतिस्पर्धी राहीलेले नाही.
रविवारी सकाळी ११ वाजता या लिलावाला सुरूवात झाली आणि दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पॅकेज ‘ए’व 'बी' साठी ४२ हजार कोटींपर्यंत बोली लावली गेली आहे. यानुसार प्रतीसामना १०० कोटी रुपये मोजण्याची तयारी स्पर्धकांनी दर्शवली आहे. आयपीएलच्या Digital Rightsचे मुल्य १९ हजार कोटी, तर LIVE Broadcast चे मुल्य हे २४ हजार कोटी लावले गेले आहे. त्यामुळे हा आकडा हळुहळ ४३ हजार कोटींच्या वर पोहोचला आहे. मागच्या लिलावात प्रती सामना ५४.५ कोटी रुपये स्टार ने मोजले होते, परंतु त्याची किंमत आता १०० कोटींच्या वर पोहोचली आहे.
बीसीसीआयचे चार विशेष पॅकेज कोणकोणते?
यावेळी प्रसारण हक्काचे वर्गीकरण बीसीसीआयने चार गटांमध्ये केलेले आहे. ज्यात प्रत्येक सत्रातील ७४ सामन्यांचा समावेश असेल. मात्र हे सामने प्रसारित करण्याची माध्यमं वेगवेगळी असतील. शिवाय २०२६ आणि २०२७ च्या सत्रासाठी बीसीसीआय सामन्यांची संख्या ९४ पर्यंत नेण्याच्या विचारात आहे.
पॅकेज ‘ए’: भारतीय उपखंडासाठी टीव्ही प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ४९ कोटी
पॅकेज ‘बी’: भारतीय उपखंडासाठी डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३३ कोटी
पॅकेज ‘सी’: प्रत्येक सत्रात १८ निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ११ कोटी
पॅकेज ‘डी’: भारतीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३ कोटी
लिलावाचा पूर्वार्ध
२००८ साली जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली तेव्हा क्लोजिंग बीडद्वारे (गुप्त बोली) पहिल्या दहा वर्षांसाठी या स्पर्धेचे टीव्ही प्रसारणासाठीचे हक्क सोनी या कंपनीने ८२०० कोटींना विकत घेतले होते. त्यानंतर २०१७ ला स्टार स्पोर्ट्सने १६,३४७ कोटींची बोली लावत टीव्ही आणि डिजिटलचे प्रसारण हक्क स्वत:च्या ताब्यात घेतले. क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वात मोठी बोली होती.
२००८ ते २०१७
सोनी इंडिया : ८२०० कोटी
२०१८ ते २०२२
स्टार स्पोर्ट्स : १६,३४७ कोटी
Web Title: IPL Media Rights LIVE UPDATES : IPL Per Match Value cross 100 CR Mark and BID stands at 42,000 CRORE
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.