IPL Media Rights : इंडियन प्रीमिअर लीग 2023 ते 2027 या पर्वांसाठी झालेल्या ई-लिलावात A व B पॅकेजसाठी जवळपास 44 हजार कोटींची बोली निश्चित झाली आहे. TV प्रसारण हक्कासाठी 57.5 कोटी, तर डिजिटल हक्कासाठी 50 कोटी निश्चित झाले आहे. यानुसार 107.5 कोटी प्रती सामना निश्चित झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीव्ही व डिजिटल या प्लॅटफॉर्मसाठी दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी बाजी मारली आहे. काहींच्या मते टीव्हीचे हक्क Sony ने पटकावले आहेत, तर डिजिटल प्लॅटफॉर्मचे हक्क मुकेश अम्बानी यांच्या Viacom18 नेटवर्कने जिंकले आहेत.
- आयपीएल प्रसारण हक्कासाठीच्या A व B पॅकेजसाठी एकूण 44,075 कोटींची बोली लागली.
- टीव्हीवरील प्रसारण हक्कासाठी प्रती सामना 57.5 कोटी म्हणजेच एकूण 23,575 कोटींची बोली निश्चित झाली.
- डिजिटल प्रसारण हक्कासाठी प्रती सामना 50 कोटी म्हणजेच एकूण 20,500 कोटी रुपये मोजले जातील.
8,200 कोटी ते 16347 कोटी अन् आता थेट 23,575 कोटी! २००८ साली जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली तेव्हा क्लोजिंग बीडद्वारे (गुप्त बोली) पहिल्या दहा वर्षांसाठी या स्पर्धेचे टीव्ही प्रसारणासाठीचे हक्क सोनी या कंपनीने ८२०० कोटींना विकत घेतले होते. त्यानंतर २०१७ ला स्टार स्पोर्ट्सने १६,३४७ कोटींची बोली लावत टीव्ही आणि डिजिटलचे प्रसारण हक्क स्वत:च्या ताब्यात घेतले. क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वात मोठी बोली होती. २००८ ते २०१७ या कालावधीसाठी सोनी इंडियाने ८२०० कोटी मोजले होते, तर २०१८ ते २०२२ या कालावधीसाठी स्टार स्पोर्ट्सने १६,३४७ कोटी मोजले.
बीसीसीआयचे चार विशेष पॅकेज कोणकोणते?यावेळी प्रसारण हक्काचे वर्गीकरण बीसीसीआयने चार गटांमध्ये केलेले आहे. ज्यात प्रत्येक सत्रातील ७४ सामन्यांचा समावेश असेल. मात्र हे सामने प्रसारित करण्याची माध्यमं वेगवेगळी असतील. शिवाय २०२६ आणि २०२७ च्या सत्रासाठी बीसीसीआय सामन्यांची संख्या ९४ पर्यंत नेण्याच्या विचारात आहे.
- पॅकेज ‘ए’: भारतीय उपखंडासाठी टीव्ही प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ४९ कोटी
- पॅकेज ‘बी’: भारतीय उपखंडासाठी डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३३ कोटी
- पॅकेज ‘सी’: प्रत्येक सत्रात १८ निवडक सामन्यांच्या डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ११ कोटी
- पॅकेज ‘डी’: भारतीय उपखंडाबाहेरील देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचे अधिकार, प्रत्येक सामन्यासाठी ३ कोटी