नवी दिल्ली: आयपीएलचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने शनिवारी पंजिबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली. या खेळाडूंमध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दोन दिवस चालणाऱ्या लिलावात दहा फ्रॅन्चायजी बोली लावतील. लिलावात २७० कॅप्ड (राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे), ९०३ अनकॅप्ड, आणि ४१ सहयोगी देशाच्या खेळाडूंनी नावे नोंदविली आहेत. एक फ्रॅन्चायजी आपल्या पथकात २५ खेळाडूंना स्थान देणार असेल तर लिलावात २१७ खेळाडूंची खरेदी होईल. त्यात ७० विदेशी खेळाडू असतील. सर्व संघ आपापल्या खेळाडूृंचा कोटा पूर्ण करतील, असे मानले जात आहे. अशावेळी लिलावात २०० हून अधिक खेळाडूंवर बोली लावली जाईल.
दिग्गजांचे ‘वॉकआऊट’
यंदा अनेक मोठी नावे आयपीएल खेळणार नाहीत. अशा खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क, इंग्लंडचा मॅक कुरेन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, ज्यो रुट, ख्रिस वोक्स आदींचा समावेश आहे.
३३ खेळाडू झाले रिटेन
२०२२ च्या पर्वासाठी ३३ खेळाडूंना रिटेन करण्यात आधीच्या आठ संघांनी २७ आणि नव्या दोन संघांनी सहा खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतले. या खेळाडूंवर ३३८ कोटी रुपये खर्च झाले. लोकेश राहुलला लखनौने १७ कोटी रुपये दिले आहेत. हार्दिकला अहमदाबादने १५ कोटीत स्वत:कडे घेत कर्णधार बनवले. यासोबतच राहुल हा आयपीएल इतिहासात सर्वांत महागडा खेळाडू बनला. याआधी आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याला २०१८ ते २०२१ च्या मोसमासाठी १७ कोटी मिळाले होते. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, केन विलियम्सन, जोस बटलर आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा रिटेन झालेल्यांमध्ये समावेश आहे.
२ कोटी बेस प्राईस असलेले १७ भारतीय ३२ विदेशी खेळाडू
भारत : आर. अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, शिखर धवन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ईशान किशन, भुवनेश्वर कुमार, देवदत्त पड्डीकल, क्रृणाल पंड्या, हर्षल पटेल, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, रॉबीन उथप्पा, उमेश यादव.
विदेशी खेळाडू : मुजीब झाद्रान, ॲश्टन एगार, नॅथन कुल्टर-नाईल, पॅट कमिंस, जोश हेजलवूड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यु वेड, डेव्हीड वॉर्नर, ॲडम झम्पा, शाकिब अल हसन, मुस्तफिजुर रेहमान, सॅम बिलिंग्स, साकिब मेहमूद, ख्रिस जॉर्डन, क्रेग ओव्हरटन, आदिल रशिद, जेसन रॉय, जेेम्स विन्स, डेव्हीड विली, मार्क वूड, ट्रेन्ट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, क्विंटन डिकॉक, मर्चन्ट डी लँग, फाफ डू प्लेसिस, कगिसो रबाडा, इम्रान ताहिर, फॅबियन ॲलेन, ड्वेन ब्राव्हो, इव्हिन लुईस, ओडीयन स्मिथ.
१.५ कोटी बेस प्राईस
अमित मिश्रा, इशांत शर्मा, वॉशिग्टन सुंदर, ॲरोन फिंच, ख्रिस लीन, नॅथन लॉयन, केन रिचर्डसन, जॉनी वेअरस्टो, ॲलेक्स हेल्स, इयोन मॉर्गन, डेव्हीड मलान, ॲडम मिलने, कॉलिन मुन्रो, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, टीम साऊदी, कॉलीन इन्ग्राम, शिमरोन हेटमायर, जेसन हॉल्डर, निकोलस पुरन.
१ कोटी बेस प्राईस
पीयूष चावला, केदार जाधव, प्रसिद्ध क्रिष्णा, टी. नटराजन, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, वृद्धिमान साहा, कुलदीप यादव, जयंत यादव, मोहम्मद नबी, जेम्स फॉल्कनर, मोईजेस हेन्रिक्स, मार्नस लाबूशेन, रिले मेरेडिथ, जोश फिलिपे, डार्सी शॉर्ट, ॲड्र्यू टाय, डॅन लॉरेन्स, लिॲम लिव्हिंगटोन, टायमल मिल्स, ऑली पोप, डेवॉन कॉन्वे, कॉलीन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, एडन मार्करम, रिले रोसेयु, तबरेज शम्सी, रॉसी वॅन डे दसेन, वानिंदू हसरंगा रोस्टन चेस, शेरफान रुदरफोर्ड.
कोणत्या देशाचे किती खेळाडू?
अफगाणिस्तान २०ऑस्ट्रेलिया ५९बांगला देश ९इंग्लंड ३०आयर्लंड ३न्यूझीलंड २९द. आफ्रिका ४८श्रीलंका ३६वेस्ट इंडिज ४१अमेरिका १४यूएई ०१स्कॉटलंड ०१ओमान ०१नेदरलॅन्ड ०१नेपाळ १५नामिबिया ०५भूतान ०१झिम्बाब्वे ०२