IPL Mega Auction 2025 : आयपीएलचा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथे पार पडेल. यासाठी जगभरातून एकूण १५७४ खेळाडूंनी लिलावात आपली नावे नोंदवली आहेत. ज्यामध्ये भारताच्या कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंच्या नावांसह एकूण ११६५ खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली. यानंतर दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक खेळाडूंनी लिलावात आपली नावे दिली आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या एकूण ९१ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ९१ खेळाडूंच्या यादीत ४४ कॅप्ड खेळाडू आणि ३२ अनकॅप्ड खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
कोणत्या देशातील किती खेळाडूंनी केली नोंदणीदक्षिण आफ्रिका - ९१ऑस्ट्रेलिया - ७६इंग्लंड - ५२न्यूझीलंड - ३९ वेस्ट इंडिज - ३३अफगाणिस्तान - २९श्रीलंका - २९बांगलादेश - १३नेदरलँड्स - १२अमेरिका - १०आयर्लंड - ९ झिम्बाब्वे - ८कॅनडा - ४स्कॉटलंड - २ यूएई - १इटली - १ दरम्यान, यंदाचा इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबरला होणार आहे. हा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह या शहरात होणार आहे. जेद्दाहच्या अबादी अल जोहर एरिनामध्ये हा लिलाव ठेवण्यात आला आहे. हॉटेल शांग्री-लामध्ये खेळाडू आणि इतर लोकांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे आयपीएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आयपीएल २०२५ साठी एकूण १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यापैकी ११६५ खेळाडू भारतीय तर ४०९ खेळाडू हे परदेशी आहेत. एकूण खेळाडूंपैकी एकूण ३२० खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे आहेत. मेगा लिलावापूर्वी सर्व १० फ्रँचायझींनी मिळून एकूण ५५८.५० कोटी रुपये खर्च करून ४६ खेळाडूंना कायम ठेवले. यामध्ये ३६ खेळाडू भारतीय तर १० विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ३६ भारतीयांमध्ये १० अनकॅप्ड खेळाडू देखील आहेत. दहा फ्रँचायझींकडे २०४ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी ६४१.५कोटी रुपये आहेत. या २०४ ठिकाणांपैकी ७० जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.