IPL Mini Auction 2024 Live Updates In Marathi : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएलचा २०२४ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. आज दुबईत आगामी हंगामासाठी खेळाडूंची लिलाव पक्रिया पार पडत आहे. खरं तर आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळाडूंवर बोली लागत आहे. लिलावाच्या मैदानात ३३३ खेळाडू असून जास्तीत जास्त ७७ खेळाडूंना संधी मिळणार आहे. आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वात कमी खेळाडू आहेत. आताच्या घडीला केकेआरकडे १२ खेळाडूंसाठी जागा रिक्त आहे. त्याचवेळी चेन्नई, लखनौ, बंगळुरू आणि हैदराबादच्या संघात ६-६ खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे.
आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. या लिलावासाठी सर्व १० फ्रँचायझींच्या खात्यात २६२.९५ कोटी रुपये आहेत आणि या पर्समधून जास्तीत जास्त ७७ खेळाडू खरेदी करता येतील. गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीकडे सर्वाधिक ३८.१५ कोटी रुपये आहेत, लखनौ सुपर जायंट्सकडे सर्वात कमी १३.१५ कोटी रुपये आहेत. आयपीएलमधील १० फ्रँचायझींनी रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार लिलावासाठी एकूण ११६६ खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी संघांनी ३३३ नावे निवडली आहेत. यामध्ये २१४ भारतीय आणि ११९ परदेशी खेळाडू, यापैकी ११६ खेळाडू कॅप केलेले आहेत, २१५ अनकॅप खेळाडू आहेत आणि दोन खेळाडू असोसिएट राष्ट्रांचे आहेत. १० संघांमध्ये एकूण ७७ जागांसाठी लिलाव होणार आहे आणि त्यापैकी ३० जागा या परदेशी खेळाडूंसाठी आहेत.
आयपीएलचा लिलाव होत असलेले ठिकाण -
दरम्यान, सर्वाधिक पैसे असलेल्या गुजरातच्या फ्रँचायझीचे लक्ष्य हार्दिक पांड्याची रिप्लेसमेंट घेण्यावर असेल. एकूण २३ खेळाडूंनी सर्वोच्च आधारभूत किंमत ब्रॅकेटमध्ये नोंदणी केली आहे. २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये मिचेल स्टार्क, ट्रॅव्हिस हेड, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. १३ खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत १.५ कोटी ठेवली गेली आहे. बेन स्टोक्स, जो रूट आणि जोफ्रा आर्चर या इंग्लिश खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमधून त्यांच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यासाठी माघार घेतली आहे. ८ वर्षांच्या विश्रांतीनंतर मिचेल स्टार्क आयपीएलमध्ये खेळणार आहे आणि त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. न्यूझीलंडचा रचिन रवींद्रने त्याची मूळ किंमत ५० लाख ठेवली आहे.
Web Title: IPL Mini Auction 2024 Live For the first time in the IPL Auction History, an audience will be present at the venue, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.