Join us  

IPL Auction Live: ६.८० अन् ७.४० कोटी! ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अन् रोवमन पॉवेल मालामाल

IPL Mini Auction 2024 Live : आज आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 1:52 PM

Open in App

IPL Mini Auction 2024 Live Updates In Marathi । दुबई : आज दुबईत आयपीएल २०२४ साठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. अलीकडेच काही नाट्यमय घडामोडींमुळे आयपीएलची स्पर्धा चर्चेत होती. जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या या ट्वेंटी-२० लीगच्या लिलावाकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. दुबईतील कोका कोला एरेना येथे हा लिलाव होत असून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतही इथे उपस्थित आहे. 

वेस्ट इंडिजच्या रोवमन पॉवेलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीमध्ये चांगलीच चुरस झाली. केकेआरकडून गौतम गंभीर तर राजस्थानकडून कुमार संगकारा रणनीती आखत होते. रक्कम ६.२० कोटीवर पोहचल्यानंतर केकेआरच्या फ्रँचायझीने थोडा विचार केला पण पॉवेलला आपल्या संघात घेण्यासाठी बोली कायम ठेवली. अखेर कोलकाताच्या   फ्रँचायझीने हार मानली अन् राजस्थान रॉयल्सने रोवमन पॉवेलला ७.४० कोटी रूपयांत आपल्या संघात घेतले. खरं तर पॉवेलची मूळ किंमत केवळ १ कोटी एवढी होती.

ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला आपल्या संघात घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझीने खूप प्रयत्न केला. वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या हेडला लिलावात चांगलाच फायदा झाला. अखेर हैदराबादच्या फ्रँचायझीने बाजी मारत विश्वचषकाच्या फायनलमधील हिरो ट्रॅव्हिस हेडला ६.८० कोटीमध्ये आपल्या संघात घेतले. 

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२३सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्स