हर्षल पटेल आयपीएल २०२४ च्या हंगामात पंजाब किंग्जच्या जर्सीत दिसणार आहे. पंजाब किंग्जने ११.७५ कोटी रुपये खर्च करून हर्षल पटेलचा संघात समावेश केला. तर हर्षल पटेलची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. पंजाब किंग्जशिवाय गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सने हर्षल पटेलसाठी बोली लावली, पण शेवटची बोली पंजाब किंग्जने जिंकली.
याआधी हर्षल पटेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता, मात्र अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हर्षल पटेलला रिलीज केले. आयपीएल लिलाव २०२३ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हर्षल पटेलला १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
हर्ष(ल)वायूचा 'झटका'!
सध्या सुरू असलेल्या लिलावात गुजरात टायटन्सने हर्षल पटेलसाठी पहिली बोली लावली. हर्षल पटेलची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. यानंतर पंजाब किंग्सने यात उडी घेतली. पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सने बोली सुरूच ठेवली. जेव्हा हर्षल पटेलची किंमत ११ कोटी रुपयांवर पोहोचली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सने एन्ट्री घेतली, परंतु या फ्रँचायझीने लगेचच माघार घेतली. अशाप्रकारे पंजाब किंग्जने हर्षल पटेलसाठी शेवटची बोली लावली. पंजाब किंग्जने हर्षल पटेलला ११.७५ कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले.