क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा नवा हंगाम आता काही दिवसांवर आला आहे. यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना ३१ मार्च रोजी खेळला जाणार आहे. गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. दरम्यान, आयपीएल सामन्यांसाठीच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. या तिकिटांच्या किमती आणि ऑफरबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
गेल्या काही हंगामांपेक्षा यंदाची आयपीएल वेगळी ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे आयपीएलच्या गेल्या तीन हंगामांवर कोरोनाचे सावट होते. मात्र यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जवळपास ३ वर्षांनंतर आयपीएलचे सामने देशातील विविध स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. तसेच आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे.
आयपीएलसाठी वेगवेगळ्या संघांनी आपल्या वेबसाईटवर होम सामन्यांसाठीच्या तिकिटांची विक्री सुरू केली आहे. आयपीएलच्या सामन्यांचं किमान तिकीट ४०० रुपये तर कमाल तिकीट हे ४५ हजार रुपये एवढं आहे. या तिकिटांच्या विक्रीसाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. त्याशिवाय पेटीएम, बुक माय शोसह अन्य वेबसाईटवरही आयपीएलच्या सामन्यांची विक्री सुरू झाली आहे. त्यावर अनेक ऑफरही दिली जात आहे. ऑनलाइट तिकीटविक्रीसह स्टेडियममधील तिकीट खिडकीवरही काही तिकिटं मिळत आहेत. मात्र त्यांची संख्या मर्यादित आहे.
Web Title: IPL minimum ticket 400 rupees, how to book tickets? Where to get offers, know everything
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.