UAEत झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वात माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघाला चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं. महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला IPL इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आलं. धोनीच्या CSKला 14 पैकी केवळ 6 सामने जिंकता आले आणि 12 गुणांसह त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अखेरच्या सामन्यानंतर धोनीनं पुढील वर्षी होणाऱ्या IPL 2021साठी संघात बदलाचे संकेत दिले होते आणि त्याचवेळी त्यानं युवा खेळाडूंकडे जबाबदारी सोपवण्याचीही इच्छा व्यक्त केली होती.
धोनीच्या या मतानंतर पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नईचे कर्णधारपद धोनी सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आणि त्याच्याजागी फॅफ ड्यू प्लेसिसचे नाव पुढे येत आहे. भारतीय संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर ( Sanjay Bangar) यांनीही धोनी पुढील वर्षी CSKचे नेतृत्व सोडून ते फॅफ ड्यू प्लेसिसकडे सोपवले, असे मत व्यक्त केले. MS Dhoniवर भविष्यात कोणती जबाबदारी देणार? CSKचे मालक एन श्रीनिवासन यांची स्पष्ट भूमिका
''जिथपर्यंत मला माहित आहे, 2011नंतर धोनी कर्णधारपदावर कायम राहायचे की नाही, याचा विचार करत होता, परंतु भारतासमोर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे दोन आव्हानात्मक दौरे होते आणि तेव्हा कर्णधारपदासाठी सक्षम पर्याय नव्हता. त्यामुळे तो कर्णधारपदावर कायम राहिला आणि योग्य वेळ आल्यावर त्यानं नेतृत्वाची माळ विराट कोहलीकडे सोपवली,''असे बांगर यांनी स्टार स्पोर्ट्सच्या Cricket Connected या कार्यक्रमात सांगितले.
ते पुढे म्हणाले,''त्यामुळे धोनीला मी जेवढा ओळखतो, त्यानुसार पुढील वर्षी तो आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून नाही, तर एक खेळाडू म्हणून मैदानावर उतरेल. तो नेतृत्वाची जबाबदारी फॅफ ड्यू प्लेसिसकडे सोपवेल आणि फॅफच्या नेतृत्वात CSKमध्ये कायापालट पाहायला मिळेल.'' नेक्स्ट जनरेशनच्या खांद्यावर जबाबदारी देण्याची योग्य वेळ; MS Dhoniनं सांगितला CSKचा फ्युचर प्लान
फॅफ व्यतिरिक्त CSK कडे कर्णधारपदासाठी सक्षम पर्याय नाही, असेही बांगर यांना वाटते. ''कर्णधार म्हणून त्यांच्याकडे दुसरा सक्षम पर्याय सध्याच्या घडीला नाही आणि जर तुम्ही ऑक्शनचा विचार करत असाल तर कोणताही संघ कर्णधारपदाचा दावेदार असलेला खेळाडू रिलीज करणार नाही,''असेही बांगर यांनी सांगितले. फॅफनं आयपीएल 2020मध्ये 13 सामन्यांत 449 धावा चोपल्या. शिवाय त्यानं दोन-तीन अफलातून झेलही टिपले.
Web Title: IPL: 'MS Dhoni Might Handover CSK Captaincy to Faf du Plessis for 2021 Season'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.