Join us  

वडिलांच्या विरोधात जाऊन 400 रूपयांसाठी खेळला सामना, आता IPL मध्ये करोडपती बनला हा क्रिकेटर!

या क्रिकेटरने आधी वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन 400-500 रुपयांत क्रिकेट खेळत होता. त्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) आयोजित केलेल्या ट्रायल्समध्ये भाग घेतला आणि येथूनच त्याचे नशीब पालटले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 4:22 PM

Open in App

आयपीएलमुळे अनेक खेळाडूंचे नशीबच बदलले आहे. खरे तर या लीगमध्ये येणाऱ्यांवर पैशांचा अक्षरशः पाऊस पडतो आणि त्यंचे आयुष्याची स्टोरीच बदलते. मोहम्मद सिराजपासून ते टी. नटराजनपर्यंत असे अनेक खेळाडू आहेत. याच रांगेत मुकेश कुमारही (Mukesh Kumar) बसू शकतो. IPL-2023 च्या लिलावात मुकेश कुमारवरही पैशांची चांगली बरसात झाली. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी 5.50 कोटी रुपये मोजले आहेत. आयपीएलपूर्वीच मुकेशची भारतीय संघात निवड झाली होती. पण त्याला पदार्पन करता आले नाही.

400-500 रुपयांसाठी खेळला सामने -मुकेशसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तो मुळचा बिहारमधील गोपालगंजचा. तो 2012 मध्ये कोलकात्यात आला आणि इथूनच त्याच्या आयुष्याच्या नवा अध्यायाला सुरवात झाली. तो आधी वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन 400-500 रुपयांत क्रिकेट खेळत होता. त्याने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) आयोजित केलेल्या ट्रायल्समध्ये भाग घेतला आणि येथूनच त्याचे नशीब पालटले. या ट्रायल्सदरम्यान बंगालचा माजी वेगवान गोलंदाज रानदेब बोस, वकार युनूस, मुथय्या मुरलीधरन आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची नजर त्याच्यावर पडली आणि ते अत्यंत प्रभावित झाले. परिणाम स्वरूप तो वर्षभराच्या आतच बंगाल संघात दाखल झाला. यानंतर तो भारत-अ संघाकडून खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याची निवड झाली होती.

मुकेश आपल्या जीवनातील संघर्षाला फारसे महत्त्व देत नाही. ते सर्वांच्याच आयुष्यात येत असतात, असे त्याचे म्हणणे आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, “माझे आयुष्य ट्रायल्ससंदर्भात आहे. आधी गोपालगंजमध्ये, जिथे मी जिल्ह्यातील सर्वोत्तम गोलंदाज बनलो आणि नंतर कोलकात्यात. कोलकात्याने माझे आयुष्य बदलले. माझ्या आयुष्यात संघर्ष होता, पण हे फार सामान्य आहे. हे सर्वांसोबतच असते. जर आयुष्यात अडचणी नसत्या तर कदाचित मी येथपर्यंत पोहोचलो नसता."

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२भारतीय क्रिकेट संघ
Open in App